शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दत्तक गावात दोन बालमृत्यू; ना रुग्णवाहिका, ना आरोग्य परिचारिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:53 IST

प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेल्या रायपूर गावात दोन जुळी नवजात मुले डॉक्टर, आरोग्य सेविका तथा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दगावली.

चुरणी (चिखलदरा) (अमरावती) : प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेल्या रायपूर गावात दोन जुळी नवजात मुले डॉक्टर, आरोग्य सेविका तथा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दगावली. १९ फेब्रुवारी रोजी ही घटना उघड झाली. या घटनेला चिखलदरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून, चौकशी आरंभली आहे.

रायपूर येथील गर्भवती महिला लक्ष्मी शिवकुमार ठाकरे (२३) हिला १९ फेब्रुवारी रोजी प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. मात्र, गावात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका तथा सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उपचारास विलंब होत गेला. परिणामी एका बालकाचा जन्म घरीच झाला. मात्र, ते बाळ उदरातच दगावले होते. त्यानंतर प्रसूत महिलेला खासगी वाहनाने सेमाडोह आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे दुसऱ्या बालकाचा जन्म झाला. त्या बालकाला अमरावती येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. या दोन्ही बालमृत्यूला सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप गावच्या सरपंच निशा लोखंडे यांनी केला आहे.कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गायबरायपूर गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, त्याठिकाणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहे. मात्र, घटनेच्या दिवशी त्यांच्यासह दोन्ही आरोग्यसेविका कर्तव्यावर नव्हत्या. एक आरोग्य सेविका अर्जित रजेवर, तर दुसरी आरोग्य सेविका प्रसूती रजेवर असल्याची माहिती सेमाडोह आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

रायपूर येथील शासकीयरुग्णवहिका अन्य कामानिमित्त इतरत्र होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद पाच वर्षांपासून रिक्त आहे. दोन्ही बालमृत्यूची माहिती घेतली. सोमवारी संपूर्ण चौकशीअंती संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करू. त्या महिलेची प्रसूती वेळेआधी झाली.- डॉ. सतीश प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी, चिखलदरा

टॅग्स :Amravatiअमरावती