फोटो पी १५ धामणगाव फोल्डर
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासांत गजाआड करण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ही कारवाई फत्ते केली.
सदर पथकाने तात्काळ मंगरुळ दस्तगीर येथे पोहोचून तांत्रिक पुराव्याच्या तसेच गोपनीय माहितीचे आधारे एटीएम फोडणाऱ्या सूरज गजानन शेंदरे (१९), मयूर सुखदेवराव क्षीरसागर (१८, दोन्ही रा. मंगरूळ दस्तगीर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सहायक पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर, हेडकॉन्स्टेबल सुनीत केवतकर, नायक पोलीस कॉन्स्टेबल बळवंत दाभणे व मंगेश लकडे, चालक नायक पोलीस कॉन्स्टेबल नितेश तेलगोटे यांचे पथक १५ मार्च रोजी चांदूर रेल्वे उपविभागामध्ये जिल्हा गस्त करीत होते. यावेळी मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याकडून त्यांना एटीएम फोडल्याबाबत माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून तातडीने दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, तसेच मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पान ३ चे लिड
———————-