५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
चांदुर बाजार: तालुक्यातील अवैध व्यावसायिकांवर धाड सत्र आणि गुन्हेगारांची शोध मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चेतन उर्फ गोलू तळकित (२७, रा. कोतगावंडी) व दिनेश खटे (२४, रा. तुळजापूर गढी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत.
आसेगाव पोलिसांच्या हद्दीतील दहिगाव ते लसनापूर मार्गाने वाळू तस्करी करीत असताना ते आढळून आले. यावेळी पोलिसांनी एक ५ लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती, दोन मोबाइल, दुचाकी असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक डॉ.हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली एसीबीचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात एपीआय गोपाल उपाध्याय, जमादार त्र्यंबक मनोहर, प्रमोद खर्चे, नीलेश डांगोरे, प्रवीण अंबाडकर, अमोल केंद्रे यांनी केली.