अमरावती : तलवार हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांना खोलापुरी गेट पोलिसांनी रविवारी भातकुली मार्गावरून अटक केली.
शेख लच्छु ऊर्फ इस्माईल शेख ऊर्फ कालू (२८ रा. हैदरपुरा) आणि शेख हसन शेख यासीन (२४ दोन्ही रा. हैदरपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय सावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
00000000000000000000000000000
अवैध दारू विकणाऱ्या महिलेसह दोघांना अटक
अमरावती : अवैध दारूची विक्री करणाऱ्या एका महिलेसह दोघांना नांदगाव पेठ पोलिसांनी रहाटगाव परिसरातून रविवारी अटक केली. धम्मदीप गणेश वानखडे (३०) व एका महिलेचा आरोपींमध्ये सहभाग आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन लोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून ४ हजार २० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
00000000000000000000000000
योगिराज अपार्टमेंटमधून दुचाकी लंपास
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील एसीबी कार्यालयासमोली योगीराज अपार्टमेंटमधून एका तरुणाची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना रविवारी उघडकीस आली. रवींद्र गणेश पेछे (३१ रा. कॅम्प, योगिराज अपार्टमेंट) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.
0000000000000000000000
कृषी केंद्रचालकाला चाकूने मारण्याची धमकी
अमरावती : उधारी पैसे मागणाऱ्या कृषी केंद्रचालकाला एका ग्राहकाने चाकू काढून जिवे मारण्याची धमकी दिली. निखिल प्रभाकर अर्मळ (३२ रा. पिंपळखुटा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी पिंपळखुटा स्थित ग्राम पंचायत चौकात उघडकीस आली. विलास बलचंद राठोड (३३ रा. बोडना) यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी निखील अर्मळविरुध्द गुन्हा नोंदविला.