शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफूट प्रकरणात दोन आरोपींना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:42 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर आहे.

ठळक मुद्देतिसऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज : फ्रेजरपुरा पोलिसांचा २१ जूनला जबाब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या विषयाच्या पेपरफूट प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमश्रेणी न्यादंडाधिकारी व्ही.एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर आहे. याविषयी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे.आशिष राऊत (रा. बोर्डी, ता. अकोट, जि.अकोला) व निखिल फाटे (रा. पलाश गल्ली, गाडगेनगर, अमरावती) या अटकेतील आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे. या दोघांनाही फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २९ मे रोजी पेपरफूट प्रकरण निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध विद्यापीठाची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. यातील दोन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीदेखील दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.अखेर आशिष राऊत व निखिल फाटे यांना जामीन मंजूर झाला आहे. तिसरा आरोपी वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर बोरे हा अद्यापही पसार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सदर केला आहे. दोन आरोपींच्या जामिनासाठी वकील प्रशांत देशपांडे, संजय चौबे यांनी बाजू मांडली. शासकीय अभियोक्ता पवार यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास फ्रेजरपुऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकर हे करीत आहेत. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांचीदेखील चौकशी होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.