शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात संत्रागळतीने अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:13 IST

निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्ग कोपला : अडीच लाखांचा बगिचा १५ हजारांत विकला

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक फटका संत्राउत्पादक शेतकºयांना बसला आहे. संत्र्याच्या आंबिया बहरावर देवाण-घेवाण, वर्षभराचा खर्च, कर्जफेड आदी अपेक्षा बाळगून असलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या नशिबी मोठी निराशा आली आहे. लाखोंची संत्री जळून जमिनीवर आल्याने मातीमोल झाली.अचलपूर तालुक्यात ६० हून अधिक खेड्यांमध्ये संत्राउत्पादक आहेत. ११ हजार ५४० हेक्टरवर संत्राबागा आहेत. मल्हारा, गौरखेडा, धामणगाव गढी, धोतरखेडा, हनवतखेडा, मुरादपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, टवलार, पथ्रोट, सालेपूर, पांढरी, सावळी आदी गावांमध्ये यंदा स्थिती विपरीत आहे.लाखोंचा माल हजारात गेलाअचलपूर तालुक्यातील जवळपास ९० टक्के संत्राउत्पादक शेतकरी आंबिया बहर घेतात. यंदा मात्र लाखो रुपयांची संत्री महिनाभराच्या दमट तापमानाने गळाली. अचलपूर येथील संत्राउत्पादक शेतकरी सुधीर डकरे यांना अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना, त्यांना १५ हजारांत संत्री विकावी लागली. नितीन डकरे यांना सहा लाखांची संत्री ९८ हजारांत विकावा लागला. वर्षभराचा खर्च दीड लाख रुपये असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चमक येथील संजय चरोडेसह इतरही शेतकºयांची व्यथा वेगळी नाही.गतवर्षी ३० रुपये किलो संत्री होती. यावर्षी मात्र २० ते २२ रुपये भाव मिळाला. गतवर्षी तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्री विविध राज्यांसह विदेशात पाठविली होती. फळगळतीने यावर्षी फटका बसला आहे.- राजेंद्र गोरले, संत्राउत्पादक तथा व्यापारी, अचलपूररायझोक्टोनिया व हायटोफोराचे आक्रमण परतवून लावण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना बोलावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. अपुºया पावसामुळेच सर्वाधिक नुकसान झाले आहे.प्रफुल्ल सातवतालुका कृषी अधिकारी