शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ आदिवासी मुले बनली एव्हरेस्टवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:54 IST

: आदिवासी विकास विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या राज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.

- नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : आदिवासी विकास विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या राज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. मिशन शौर्य अंतर्गत सहा विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनींनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. या मोहिमेचे नेतृत्व करण्याचा मान सुरगाणा तालुक्यातील हस्ते येथील हेमलता गायकवाड या अकरावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीला मिळाला, हे विशेष.आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेचा सुग्रीव मुंदे व अंकुश विठ्ठल बाभळे, टेंभली येथील शासकीय आश्रमशाळेचा मुन्ना साबूलाल धिकार आणि बिजुधावडी येथील शासकीय आश्रमशाळेचा शिवचरण भिलावेकर या चार विद्यार्थ्यांची निवड गिर्यारोहणासाठी झाली होती. त्यापैकी अंकुश बाभळे हा बेस कॅम्पमध्ये आजारी पडला, तर उर्वरित तीन विद्यार्थ्यांनी राज्यभरातील आपल्या इतर सहा सहकाऱ्यांसोबत ‘मिशन एव्हरेस्ट’ फत्ते केले.याशिवाय अलंगुण (जि. नाशिक) येथील अनुदानित आश्रमशाळेची हेमलता गायकवाड, देवगाव (जि. पालघर) येथील माधवराव काळे आश्रमशाळेचा केतन जाधव, बोरीपाडा (जि. नाशिक) येथील शासकीय आश्रमशाळेचा अनिल कंदे, वाघेरा (जि. नाशिक) येथील अनुदानित आश्रमशाळेचा मनोहर हिलीम, देवाडा (जि. चंद्रपूर) येथील शासकीय आश्रमशाळेचा सूरज आडे, जिवती (जि. चंद्रपूर) येथील शासकीय आश्रमशाळेची अंतुबाई कोटनाके, कापरा (जि. यवतमाळ) येथील शासकीय आश्रमशाळेची सुषमा मोरे यांचाही एव्हरेस्ट सर करणाºया विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. त्यांना नागपूरच्या अविनाश देऊस्कर आणि बिमला नेगी देऊस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे सचिव यूपीएस मदान, प्रधान सचिव मनीषा वर्मा, अपर आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्र, धारणीचे प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.>मिशन शौर्यआदिवासी विभागामार्फत मिशन शौर्य राबविण्यात येते. राज्यातील ९ आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट केले. या प्रकल्पांतर्गत चौघांची निवड झाली होती. एक आजारी पडल्याने तिघांनी सहभाग दर्शविला.- शुशीलकुमार खिल्लारे, प्रकल्प अधिकारी, धारणी