शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

हळदीवर करपा रोगाचा 'अटॅक'

By admin | Updated: September 23, 2015 00:16 IST

वरुड तालुक्यातील घाटावरच्या हळद पिकाला अखेरची घरघर लागली आहे.

वरुडचे उत्पादक हवालदिल : उत्पादन खर्च काढणे कठीणलोकमत विशेषसंजय खासबागे वरुडवरुड तालुक्यातील घाटावरच्या हळद पिकाला अखेरची घरघर लागली आहे. निसर्गातील वातावरणीय बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने हळद उत्पादकांनी हळदीचे उत्पादनसुध्दा कमी होऊ लागले आहे. ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचे भाव मिळत असल्याने उत्पादनखर्च काढणे कठीण झाले आहे. यामुळे कृषी विभागाने हळद पिकाचा मसाले पिकात समावेश करून शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने हळदीचे पारंपरिक पीक गत शेकडो वर्षांपासून घेण्यात येत आहे. हळदीमळे शेंदूरजनाघाट येथे कुंकवाचे कारखाने होते. पंरतु बदलत्या काळानुसार येथील कुंकवाच कारखाने नेस्तनाबूत झाले. हजारो टन हळदीचे उत्पादन घेतले जाऊनही या परिसरात एकही हळद प्रक्रिया करणारा कारखाना उभा राहिला नाही. यामुळेच घाटावरच्या हळदीला न्याय मिळू शकला नाही. यावर्षी तालुक्यात ८० हेक्टर जमिनीमध्येच हळदीचे पीक आहे. हळदीला मागणी वाढत असली तरी उत्पादन होत नाही. उत्पादन विक्रीकरिता बाजारपेठ नाही. जीवापाड मेहनत करुन उत्पादित हळद दलालाकडून व्यापाऱ्यांच्या घशात दिल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नव्हता. हळदीचे पीक खर्चीक असल्याने परवडणारे नव्हते. यामुळे या पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. हळद लागवडकरण्याकरिता तत्पूर्वी वखरवाही केली जाते. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस येण्यास सुरुवात झाल्यावर लागवड करतात. लागवड ही कुदळी पध्दतीने केली जाते. हळदीवर वेळोवळी यावर रासायनिक खते, किटकनाशके सह आदीचा खर्च होतो. एकूण १० महिन्याचे पीक असते. शिमग्याच्या महिन्यात हळद जमिनीतून काढण्यास सुरुवात होते. हळद काढताना हळदीची मोड आणि बीज वेगळे काढतात. त्यानंतर ती शिजविण्याकरिता खळ्यावर नेली जाते. याकरिता गावाबाहेर एका शेतात उकाडा लावण्यात येतो. उकाड्यावर मोठी चूल असून त्यावर एक लोखंडी कढई असते. यामध्ये १/३ पाणी टाकून हळदीची मोड टाकली जाते. एकावेळी ८ क्विंंटल हळद शिजविण्याची क्षमता या कढईची आहे. कढईमध्ये टाकलेल्या हळदीच्या मोडीवर पाणी टाकले जाते. हळदीवर गोणपाट किंंवा तरट झाकून हळदीचा पालापाचोळा टाकतात. १५ ते २० मिनीट हळद उकळण्याचा कार्यक्रम होऊन वाफ बाहेर येताच तो उकाडा बंद करुन हळद खळयावर टाकली जाते. शिजविलेली हळद १५ ते २० दिवस वाळू घातली जाते. वाळलेली हळद ज्याला सूट म्हटले जाते. ती बाजारात चिल्लर विक्रीमध्ये २०० ते २५० रुपये किलो प्रमाणे विकल्या जात होती. परंतु मोठी बाजारपेठ नसल्याने व्यापाऱ्यांचे दलाल हळदीची खरेदी करतात. ठोक विक्रीमध्ये १४ ते १५ हजार रुपये खंडी म्हणजे क्विंंटलनुसार ७ ते ८ हजार रुपये दराने मागणी असल्याचे ंसांगितले जाते. येथून खरेदी झालेल्या हळदीला विदेशातसुध्दा मागणी आहे. परंतु अलीकडे पुरेसा भाव मिळत नसल्याने उदासीनता दिसून येत आहे.