शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नरबळी देण्याचा प्रयत्न; दोघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:26 IST

नरबळी प्रयत्नाप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत सोमवारी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

- गणेश देशमुख अमरावती : पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या नरबळी प्रयत्नाप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत सोमवारी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये शिक्षा ठोठावण्यात आलेले राज्यभरातील हे पहिलेच प्रकरण असल्याची माहिती पैरवी अधिकारी योगेंद्र लाड यांनी दिली. 'लोकमत'ने शोधपत्रकारितेच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणले होते, हे येथे उल्लेखनीय.काय आहे प्रकरण?७ आॅगस्ट २०१६ रोजी धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज आश्रमात निवासी शाळेच्या इयत्ता पाचवीत शिकणारा प्रथमेश अवधूत सगणे हा ११ वर्षांचा विद्यार्थी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला.वैद्यकीय इलाजादरम्यान आश्रमातील व्यक्तींनी सदर घटना अपघात असल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. 'लोकमत'ने या प्रकरणाला वाचा फोडली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी मामांच्या तक्रारीनुसार, भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, १२०(ब) आणि अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्याच्या २ (१)(ख)(३) कलमान्वये गुन्हा नोंदविला. घटनाक्रमाच्या पुढील साखळीत सुरेंद्र रमेश मराठे (३०) आणि नीलेश जानराव उके (२२) या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे दोघे आश्रमातील भोजनालयात आचारी होते.