शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीपूड डोळ्यात फेकून लूटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:23 IST

डोळ्यात मिरचीपूड फेकून एका इसमास लूटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ बसस्थानकाबाहेर घडली. नागरिकांनी एका आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, दोन आरोपी पसार झाले आहेत.

ठळक मुद्देएक अटक, दोन पसार : राजापेठ बसस्थानकासमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका इसमास लूटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ बसस्थानकाबाहेर घडली. नागरिकांनी एका आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, दोन आरोपी पसार झाले आहेत.पोलीस सूत्रानुसार, विकास किरण खोब्रागडे (२६,रा.पाटीपुरा, यवतमाळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. छांगाणीनगरातील रहिवासी विजय माधव पांगरे (५८) सागर सेल्स कंपनीत वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. रविवारी सकाळी ते यवतमाळ येथे वसुली कामाने गेले. तेथील व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली ९५ हजार २०० रुपयांची रक्कम बॅगेत टाकली आणि ते तेथील बसस्थानकावरून सायंकाळी शिवशाही बसमध्ये अमरावती येण्याकरिता बसले. रात्री ८.३० वाजता शिवशाही राजापेठ बसस्थानकात पोहोचली. बॅग हाती घेऊन बसमधून उतरून बाहेर आले आणि मालक दीपक वसंतवाणी (रा.विलासनगर, सिंधी कॅम्प) यांची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान त्यांच्या मागून एक व्यक्ती आला आणि काही न बोलता त्याने विजयच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकली. त्या भामट्याने विजयच्या हातातील बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. दोघांमध्ये चांगलीच झटापट सुरू असताना त्या व्यक्तीचे अन्य दोन साथीदार विजयजवळ आले. त्यापैकी एकाने चाकू दाखविताच विजय यांनी आरडाओरड सुरू केली. विजय यांचा आवाज ऐकून बसस्थानक परिसरातील काही नागरिक मदतीसाठी धावून गेले. नागरिक येत असल्याचे पाहून तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नागरिकांच्या हाती विकास खोब्रागडे लागला, तर त्याचे अन्य दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनेच्या माहितीवरून पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विकास खोब्रागडेला ताब्यात घेतले. याप्रकरणात विजय पांगरेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी भादंविच्या कलम ३९३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर करीत आहे.विकास खोब्रागडेचीही पोलिसांत तक्रारबॅग हिसकण्यासाठी आलेल्या विकास खोब्रागडेला नागरिकांनी चोप देऊन राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. नागरिकांच्या मारहाणीत विकास जखमी झाला होता. त्यानेही पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.