धामणगाव रेल्वे : देवगाव येथून धामणगावकडे जाणारा मिनी ट्रक जळका पटाचे गावानजीक बुधवारी सकाळी उलटला. यामुळे त्यामध्ये असलेले बटाटे रस्त्यावर आले होते. धामणगाव शहरातील बुधवार बाजारात देवगावकडून बटाटे विक्रीसाठी आणणारा एमएच ४९ एटी ४६७२ क्रमांकाचा हा मिनी ट्रक होता. या अपघातात जीवितहानी झाली नाही.
देवगाव परिसरात ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST