शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

म्हशींनी भरलेला भरधाव ट्रक उड्डाणपुलाला धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

फोटो पी ०५ नांदगाव नांदगाव पेठ : छिंदवाडा येथून म्हशी घेऊन अमरावतीकडे भरधाव जाणारा ट्रक उड्डाणपुलाला धडकल्याने ...

फोटो पी ०५ नांदगाव

नांदगाव पेठ : छिंदवाडा येथून म्हशी घेऊन अमरावतीकडे भरधाव जाणारा ट्रक उड्डाणपुलाला धडकल्याने झालेल्या जबर अपघातात ८ म्हशी जागीच ठार झाल्या. २५ म्हशी गंभीररीत्या जखमी झाल्या. अपघातानंतर चालक - वाहक घटनास्थळाहून पसार झाले. क्लिनर वाहनात अडकल्याने त्याला पोलिसांनी बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठे पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.

घटनेची हकीकत अशी की, ट्रक क्र. यूपी १२ बी.टी. २४५१ छिंदवाडा येथून ३३ म्हशी घेऊन अमरावतीकडे जात असताना सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उड्डाणपुलाखालून अमरावती मार्गावर येण्यासाठी भरधाव निघाला असता उड्डाणपुलाच्या भिंतीला ट्रकची जबर धडक लागली. ट्रक महामार्गाच्या विरुद्ध दिशेने थेट एका हॉटेलनजीक येउन धडकला. या घटनेत ८ म्हशी जागीच ठार झाल्या तर अन्य म्हशी जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या गोरक्षण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सादिक नामक क्लिनर हा वाहनात अडकल्याने पोलीस निरीक्षक कुरळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्यांनी सादिकला बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही तासासाठी ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने दगावलेल्या म्हशींना इतरत्र हलवून त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदगांव पेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.