बोरगाव मंजू (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजूनजीक ट्रक व इंडिका गाडीचा अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात कारमधील फैजल खान फिरदोस खान (रा. अमरावती) हे ठार झाले. अमरावतीवरून अकोलाकडे जात असलेल्या एमएच 0२ डब्ल्यूए ५५३६ या क्रमांकाच्या कारला विरुद्ध दिशेने येणार्या एमएच १८ एए ९३७१ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. अपघातात कारचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार भास्कर तवर, हेकाँ. जनार्दन चंदन, संतोष तिवारी, गजेंद्र मानेवार, शशिकांत पाटील, विलास जामनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत व जखमी अमरावती येथील रहिवासी अपघातामुळे कारमधील प्रवासी सचिन आखरे (२0), विनीत मिश्रा (३0), अजिंक्य मोहोड (२५), सागर आगरकर, फैजल खान फिरदोस खान हे गाडीत अडकले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात भरती केले. हे सर्व अमरावती येथील रहिवासी आहेत. मृत व जखमी अमरावती येथील रहिवासी अपघातामुळे कारमधील प्रवासी सचिन आखरे (२0), विनीत मिश्रा (३0), अजिंक्य मोहोड (२५), सागर आगरकर, फैजल खान फिरदोस खान हे गाडीत अडकले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात भरती केले. हे सर्व अमरावती येथील रहिवासी आहेत.
ट्रक-कारच्या अपघात; एक ठार
By admin | Updated: May 16, 2016 01:28 IST