फोटो पी २८ चांदूर अपघात नावाने
चांदूर रेल्वे: भरधाव ट्रकने कारला कावा मारला. त्यामूळे ती बसस्टॅडलगतच्या चार आॅटोवर जाऊन आदळली. चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावरील मांजरखेड कसबा गावाजवळ सोमवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ट्रक व कार ही दोन्ही वाहने वर्धेकडे चालले होते. यामध्ये जीवीतहाणी झाली नाही. मात्र कारसह चार आॅटोचे मोठे नुकसान झाले. पोलिस सुत्रांनुसार अमरावती येथून एमएच ०६ एक्यु १९८० हा ट्रक वर्धेकडे निघाला होता. ट्रक चालकाने वर्धेकडे जाणाºया एमएच १९ एएक्स ६१४ या कार वाहनास मांजरखेड कसबा गावाजवळ कट मारला. त्यामूळे कार मांजरखेड कसबा बस स्टँडवर उभे असलेल्या आॅटोवर जाऊन आदळली. त्यामूळे कारसह चार आॅटोचे मोठे नुकसान झाले. चांदूर रेल्वे पोलिसांनी ट्रक चालक आरोपी रमेश नथ्थुजी डोंगरे (६२, रा.टाकळी जहांगीर) याला अटक केली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम २७९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास धोंडे करीत आहे.
----------------------------------------