शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

न्यायालयात आदिवासींचा राडा

By admin | Updated: July 6, 2016 00:05 IST

गुगामल वन्यजीव अंतर्गत हरिसाल व्याघ्र जंगलात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सायल शिकारप्रकरणी वनकोठडीत असलेल्या....

आरोपीला मारहाण प्रकरण : एसडीपीओ, ठाणेदारांचा ठिय्याश्यामकांत पाण्डेय  धारणीगुगामल वन्यजीव अंतर्गत हरिसाल व्याघ्र जंगलात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सायल शिकारप्रकरणी वनकोठडीत असलेल्या आडा पटेल श्रीकृष्ण ओंकार जावरकर (४८, रा. पोटीलावा) याला वनकोठडीत मारहाण झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले आणि मंगळवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्याची माहिती मिळताच आदिवासींनी न्यायालयासमोर राडा केला. ही घटना मंगळवारी घडली. सायल शिकारप्रकरणी १ जुलै रोजी पोटीलावा येथील आडा पटेल श्रीकृष्ण जावरकर याला अटक करण्यात आली होती. येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारपर्यंत त्याला वनकोठडी दिली होती. मात्र, वनकोठडीत श्रीकृष्णला वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची बातमी गावकऱ्यांना कळताच गावात तणाव निर्माण झाला. मंगळवारी श्रीकृष्णला न्यायालयात उपस्थित केले जाणार होते. ही माहिती मिळताच संतप्त गावकरी न्यायालय परिसरात दाखल झाले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार के.बी.गवई, एपीआय महादेव भारसाकळे पोलीस दलासह न्यायालयात पोहोचले. एसडीपीओ सेवानंद तामगाडगे यांच्या उपस्थितीत जमावाला पांगविण्यात आले. माजी आमदार राजकुमार पटेल हे सुद्धा न्यायालयात दाखल झाले. २६ मे रोजी पोटीलावा येथील गोविंद जावरकर याचे शेतातून वनविभागाने सायलचे ५०० ग्रॅम मांस जप्त केले होते. मात्र, आरोपींनी पळ काढला होता. आरएफओ ए. एल. सुलतणे, वनपाल बी. आर. पवार, वनरक्षक ओंकार शेळके, समाधान कांबळे यांच्यासह बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाने आरोपी श्रीकृष्णची जामिनावर सुटका केल्याने संतप्त झालेल्या पोटिलावा ग्रामस्थांचा संताप निवळला. (तालुका प्रतिनिधी) ‘आडा पटेल’म्हणजे काय ?श्रीकृष्ण जावरकर हा पोटीलावा गावातील आडा पटेल आहे. मेळघाटातील प्रथेनुसार गावात एका व्यक्तीची आडा पटेल म्हणून नियुक्ती केली जाते. याला शासनाने नियुक्त केलेल्या पोलीस पाटलापेक्षा अधिक सन्मान गावकरी देतात. त्यामुळे आडा पटेलला झालेल्या अटकेच्या विरोधात मंगळवारी न्यायालयात आदिवासींनी धडक दिल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.