शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत पाण्यासाठी आदिवासींची पायपीट

By admin | Updated: February 14, 2016 00:17 IST

उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे.

योजनेला पांढरा हत्ती : फटका भारनियमनाचाधारणी : उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे. गेल्यावर्षी कमी पाऊ स झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अशातच गावखेड्यात १८ ते २० तासांपर्यंत भारनियमन होत असल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा योजनेलाही बसत आहे. गावात मोठी पाण्याची टाकी आहे. मात्र सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे एक ते दोन किलोमीटर अंतरावरून विहिरीतून टाक्यापर्यंत पाणी येणे कठीण झाले आहे. मेळघाटातील प्रत्येक गावालगतच्या शेतातील विहिरीत भरपूर पाणीसाठा असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. पहिले पाण्याजवळ विहीर खोदल्याने हमखास पाणी लागते व खोलीकरण जास्त न करता देयके काढता येते. दुसरा फायदा दगड व रेती या पात्रातून चोरून कामे चालविले जाते. तिसरा फायदा २ कि.मी. पाईपलाईनचे खड्डे व पाईपच्या अंदाजपत्रकात वाढ करता येतो. मात्र सर्वांचा फटका ज्या गावात नळयोजना आहे, त्या गावकऱ्यांना बसत आहे. इतक्या लांब अंतरावरून विहिरीतून पाणी टाक्यापर्यंत येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचे उदाहरण तालुक्यातील मांडवा, बासपानी, खापरखेडा, झिलपी, पोहरा, निरगुडी, धारणमहू, पाटीया, चटवाबोड, वैरागड, कुटंगा, रोहणीखेडा, बिजुधावडी, खारी यासह अनेक गावांत पहावयास मिळत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.