शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकितऐवजी ‘आयएसओ’ शाळांमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 18:26 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना आता नामांकितऐवजी ‘आयएसओ’ निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता ‘ट्रायबल’ने राज्यातील एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ते ६ वी पर्यंतचे इंग्रजी माध्यमांचे सीबीएसई वर्ग सुरू करून त्या शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांना आता नामांकितऐवजी ‘आयएसओ’ निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याकरिता ‘ट्रायबल’ने राज्यातील एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ते ६ वी पर्यंतचे इंग्रजी माध्यमांचे सीबीएसई वर्ग सुरू करून त्या शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नामांकित शाळा संस्थाचालकांची मनमानी मोडीत निघणार आहे.राज्य शासनाच्या २८ आॅगस्ट २००९ रोजीच्या निर्णयानुसार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश योजनेची मुहूर्तमेढ रोवली. नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षी प्रतिविद्यार्थी ५० हजार रूपये संस्थेला दिले जायचे. मात्र, नामांकित शाळांमध्ये शिक्षणाचे तीनतेरा वाजत असल्याने आता ‘ट्रायबल’ने स्वत:च्या शाळा आयएसओ करण्याचा मानस  केला आहे. विशेषत: एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ते ६ वीचे इंग्रजी माध्यमांचे सीबीएसई शिक्षण सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र ‘ट्रायबल’ विभागाचे उपसचिव सु.ना. शिंदे यांनी निर्गमित केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या आयएसओ दर्जा प्राप्त व परिपूर्ण सोयीसुविधा असलेल्या शाळा तसेच कराडी पथ प्रकल्प चालू असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमांचे इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करावे आणि वर्गवाढीनुसार प्रत्येक वर्षी पुढील वर्ग सुरू करावेत, असे निर्देश आहे. त्यामुळे यापूर्वी निवड झालेल्या खासगी संस्थांच्या नामांकित शाळांमध्ये पुढील वर्षी विद्यार्थी देण्याच्या अगोदर ‘ट्रायबल’च्या आयएसओ आणि परिपूर्ण सोयीसुविधा असलेल्या शाळांमध्येच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा, असे धोरण ठरले आहे. 

एकलव्य, शासकीय आश्रमशाळा कात टाकणारआदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्रवेशासाठी एकलव्य अथवा शासकीय आश्रमशाळांना प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे एकलव्य निवासी शाळेत इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत वर्ग सुरू केले जातील. शासकीय आश्रमशाळांना सोयीसुविधांची पूर्तता करून त्या ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करतील, अशी वाटचाल सुरू झाली आहे. आता एकलव्य आणि शासकीय आश्रमशाळा कात टाकणार दिसून येते.

आयएसओ शाळा म्हणजे काय?अमरावती विभागात ‘ट्रायबल’च्या ८१ पैकी २६ शाळांनी आयएसओ दर्जा प्राप्त केला आहे. उर्वरित शाळांचा आयएसओंसाठी प्रवास सुरू झाला आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, पक्ष्यांसाठी पाणी, शुद्ध पाणी, सुंदर परिसर, शाळांच्या बोलक्या भिंती, रंगरंगोटी, विद्यार्थी आणि शिक्षकांना ड्रेस कोड, स्वतंत्र प्रसाधनगृहे, शौचालये आदी सोयीसुविधा आयएसओ शाळांना दर्जासाठी आवश्यक आहे.

शासन पत्रानुसार एकलव्य शाळा किंवा शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून आरंभली जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली आहे.- नितीन तायडे,उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :Schoolशाळा