शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आठवडी बाजारात थाट्यांच्या नाच-गाण्याची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 10:31 IST

दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता.

ठळक मुद्देगोंड समाजाची परंपरामेळघाटसह मध्य प्रदेशच्या सीमेवर दिवाळीनंतर जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता.मेळघाटात बहुसंख्येने असलेल्या गोंड समाजात थाट्या या शब्दाचा अर्थ होतो गुराखी. वर्षभर गावातील गुरेढोरे जंगलात नेऊन चारणाऱ्या या थाट्यांच्या आनंदपर्वाला दिवाळीतील गोवर्धन पूजेपासून सुरुवात होते. मालकांकडून मिळणाऱ्या हक्काच्या बक्षिसीवर ते जल्लोष करतात. तब्बल आठवडाभर हे गुराखी नाचगाणे म्हणत हा आनंद साजरा करतात. चिखलदरा तालुक्यातील काजलडोह, डोमा, कोयलारी, बगदरी, कोटमी आदी गावांमध्ये गोंड समाजातील थाट्यांची संख्या अधिक आहे. संपूर्ण गावांची गुरे मोजून सकाळी घेऊन जाणे आणि सायंकाळी परत आणणे हीच त्यांची दिनचर्या. या रोजच्या कामातून उसंत त्यांना मिळत नाही. त्यामुळे थाट्या बाजाराची ते वर्षभर वाट पाहतात.

ढोल-बासरीच्या स्वरांनी आसमंत निनादलागोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशीपासून मेळघाटच्या काही गावांसह मध्य प्रदेशातील गावांमध्ये या थाट्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सावलमेंढा येथील बाजारात गुराखी म्हणून ओळख असलेल्या गोंड समाजातील थाट्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेत दाखल झाले. बाजाराचे आकर्षणाचे ते केंद्रबिंदू ठरले. लांब तुतारी, तेवढीच लांब बासुरी व ढोलकीवर थाप देत, पायात बांधलेल्या घुंगरांच्या तालबद्ध नादाने त्यांनी आसमंत निनादून टाकला. यानंतर बुधवार-गुरुवारी कुनखेडी, मेळघाटातील चुरणी, काटकुंभ येथे थाट्या बाजार भरणार आहे. 

नाचगाणे गात मागतात बक्षीसगावातील ज्या पशुपालकांची गुरे वर्षभर थाट्या चराईसाठी घेऊन जातात, त्यांच्याकडून हक्काने बक्षिसांची रक्कम ते मागतात. आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसभर जमा केलेली बक्षिसांची रक्कम सायंकाळी एकत्र करून जल्लोष केला जातो. आवडीनुसार खानपान केले जाते. मेळघाटात आदिवासी गोंड समाजाची संख्या काटकुंभ भागात काही गावांमध्ये सर्वाधिक आहे. वर्षातून एकदाच बक्षिसांची मागणी होत असल्याने पशुपालक त्यांना आनंदाने देतात. या थाट्या बाजाराला पाहण्यासाठी ज्या गावातील आठवडी बाजार असेल, त्या पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावतात, हे विशेष. त्यामुळे नेहमीच्या आठवडी बाजारापेक्षा या दिवसांतील आठवडी बाजार माणसांनी फुललेले दिसतात.

गोंड समाजातील थाट्याची परंपरा असून, वर्षातून एकदा ते आपला आनंदपर्व साजरा करतात. त्यांचा हा सर्वात मोठा सण असतो.- जुगराम सलामे,बगदरी

टॅग्स :cultureसांस्कृतिक