शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून मेळघाटातील आदिवासी मुलांचे अपहरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:46 IST

पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआठ मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.याप्रकरणी तालुक्यातील धारणमहू येथील नारायण बंसी जावरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १५ वर्षीय मुलगा रवींद्रसह अन्य सात मुलांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील सेक्टर ७, प्लॉट ३ मधील ऋग्वेदांत पावडर कोटिंग या कंपनीतील प्रवीण गावंडे व संजय पाटील हे कामाला लावून देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेले. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी गावातून गेल्यापासून पालकांचा मुलांशी संपर्क होऊ शकला नाही. गावंडे व पाटील यांच्याशी संपर्क केल्यावर मुलांना परत पाठवतो, एवढेच उत्तर मिळत आहे. अखेर त्रस्त झालेल्या पालकांनी धारणी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.प्रथमच तक्रारमेळघाटातून रोजगाराचे आमिष दाखवून आदिवासींना परप्रांतात किंवा मोठ्या शहरात घेऊन जाण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील अनेक आदिवासींनी रोजगारासाठी मेळघाटातून पाय काढला. मात्र, प्रथमच शाळकरी मुलांना घेऊन गेल्यावर त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.अशी आहेत मुलांची नावेरवींद्र नारायण जावरकर, श्रीराम शोभाराम पाटणकर, सुमीत सुरेश धांडे, रीतेश चम्पालाल मावस्कर, राहुल कोम्बा भिलावेकर, मुन्नू ताराचंद कासदेकर, रामेश्वर कैलास कासदेकर, कृष्ण जीवन मावस्कर यांचा समावेश आहे. यापैकी काही मुले शाळकरी विद्यार्थी आहेत, तर काहींनी शाळा सोडली आहे.अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक पालकांसह रवाना करणार आहे. या प्रकरणाचा आम्ही सर्वांगाने तपास करीत आहोत.- किशोर गवई, ठाणेदार, धारणी

टॅग्स :Kidnappingअपहरण