शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर तालुक्यात वृक्षतोड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:41 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सुरू असून संबंधित वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तालुक्यातील आरा मशीनवर लाकडांचा ढीग

आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सुरू असून संबंधित वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या आरामशीनवर लाकडांचे मोठे-मोठे ओंडके अवैध वृक्षतोडीची साक्ष देत आहेत.अवैध वृक्षकटाई करणारे व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक टंचाईचा फायदा घेऊन कमी दराने शेतीमधील अशा प्रकारचे वृक्ष विकत घेऊन व कोणतीही संबंधित कार्यालयाची परवानगी न घेता झाडे रातोरात कापून वाहनाने घेऊन जातात. चांदूरबाजार शहरालगतच नानोरी, सोनोरी जुन्या मार्गावर निर्माण होणाºया विद्युत उपकेंद्राजवळ लागून असणाºया शेतामध्ये जवळपास ५० ते ६० वर्षांचे वय असणारे वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्या आहेत. अमरावती मार्गावरील गॅस एजन्सीकडे जाणाऱ्या मार्गावरील लेआऊटमधील १५ ते २० निंबाचे झाडे कापण्यात आलीत. तालुक्यातील हैदतपूर जंगलाच्या परिसरात धुऱ्यावर असणारे असेच निंबाचे व इतर वृक्षाचे झाडे तोडण्यात आले आहे. ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, थुगाव, आसेगाव परिसरातील आणि परिसरातील शेताच्या धुºयावरील वृक्षकटाई सुरू असल्याची चर्चा आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले वृक्षतोडीचे अधिकारी कमी करून वृक्ष कापण्याची परवानगी देण्याचे अधिकार शासनाने वन विभागाला दिले आहे. वनविभागात कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे वनविभाग वृक्ष कटाईवर लक्ष ठेवू शकत नसल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जणूकाही तालुक्यात अवैध वृक्षकटाईला उधाण आल्याचे दिसत आहे.