शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

ट्रॅव्हलरवर गोळीबार, दरोडा फसला; नंतर चालकाला उचलून ट्रक पळवला

By प्रदीप भाकरे | Published: March 11, 2024 8:13 PM

नांदगाव पेठजवळ थरार : चार जण जखमी, दहा हजार रुपये लुटले

अमरावती: शेगाव येथून दर्शन आटोपून नागपूर येथे परत जाणाऱ्या ट्रॅव्हलर वाहनावर रविवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास शिवणगावनजीक काही अज्ञातांनी गोळीबार केला. जबरी चोरीचा हा प्रयत्न फसल्याने अज्ञात दरोडेखोरांनी पुन्हा नांदगाव पेठकडे कूच करत सावर्डीनजीक असलेल्या बोगद्याजवळ एका ट्रकला अडवून चालक व वाहकाचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्याजवळील दहा हजार रुपयांची रोकड लंपास करून ट्रकदेखील पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीस आली. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी जबरी चोरी व आर्मॲक्टचा गुन्हा दाखल केला आहे.

मानेवाडा नागपूर येथील चार ते पाच कुटुंबांतील १७ सदस्य रविवारी सकाळी ट्रॅव्हलरने (क्र. एमएच १४ जीडी ६९५५) शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील दर्शन आटोपून ते रात्री अमरावती येथील अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले आणि जेवण करून राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठमार्गे नागपूरकडे निघाले. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास शिवणगावजवळ एका चारचाकी वाहनातील दोघांनी ट्रॅव्हलरवर अंदाधुंद गोळीबार केला. चालकाच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून बंदुकीमधील एक गोळी चालक खोमदेव केशवराव कवडे (३९, रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर) यांच्या हाताला स्पर्श करून गेली. तर तीन गोळ्या प्रवाशांच्या दिशेने झाडण्यात आल्या. यामध्ये चालक खोमदेव कवडे, राकेश कनेर यांच्यासह दोन लहान मुलेदेखील जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकाराने चालकासह प्रवासी भयभीत झाले.

चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता थेट तिवसा येथे आणले. घटनेची माहिती कंट्रोल रूमला मिळताच नांदगाव पेठ आणि तिवसा पोलिसांना सूचना देण्यात आल्या. तिवसा पोलिसांनी तातडीने जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ट्रॅव्हलर वाहनामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही होते. या घटनेने परिवारातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. दरोडा टाकण्याच्या मनसुब्याने हा हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

ऊर्जा प्रकल्पाकडे जाणारा ट्रक अडविला

ट्रॅव्हलर वाहनातील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न फसल्याने अज्ञात आरोपी परत चारचाकी वाहनाने नांदगाव पेठच्या दिशेने निघाले. रात्री १:३० वाजेच्या सुमारास सावर्डी येथील उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ एका ऊर्जा प्रकल्पामध्ये जाणाऱ्या ट्रक (क्र. डब्ल्यूबी ५३ सी २७२४) त्यांनी अडवला. बंदुकीच्या धाकावर चारचाकी वाहनातील तिघांनी ट्रकचालक रवींद्र नामदेव बलखंडे (४०, रा. इंदिरानगर, कळमनुरी, हिंगोली) व वाहक किरण कैलास बेलखंडे (रा. हिंगोली) या दोघांना ट्रकमधून खाली ओढले. दोन लुटारू ट्रकजवळच थांबले. अन्य लुटारूंनी रवींद्र व किरण यांना आपल्या वाहनात कोेंबून त्यांच्या कानपट्टीला बंदूक लावून रस्त्याच्या बाजूला नेले.

पाहतात तर काय ट्रकही गायब!लुटारूंनी हवेत दोन वेळ गोळीबार करून ट्रकचालक व वाहकाकडून १० हजारांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांच्याच कपड्यांनी त्यांचे हातपाय बांधून व गोळ्या मारण्याची धमकी देऊन लुटारू पळून गेले. दोन तास जीव मुठीत घेऊन लपल्यानंतर रवींद्र व किरण ट्रक उभा केला होता त्या ठिकाणी आले असता ट्रकदेखील गायब झाल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. लगेचच दुसरी तक्रार आल्यानंतर नांदगाव पेठ पोलिसांची पायाखालीची वाळू सरकली. याबाबत पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यात वापरलेले वाहन चोरीचे

तपासादरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन नाशिक येथून चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या वाहनावरील नंबर प्लेट उत्तर प्रदेशची असून, दोन दिवसांपूर्वी हे वाहन चोरीला गेल्याची तक्रार नाशिक पोलिसांमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन सीसीटीव्हीत कैैद झाले असून, त्यातून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

टॅग्स :RobberyचोरीAmravatiअमरावती