शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

प्रवाशांची तारांबळ : रेल्वे प्रशासनाची प्रचंड उदासीनता

By admin | Updated: July 27, 2016 00:05 IST

सोमवारी रात्री बरसलेल्या मूसळधार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकातील तिकिट घर, रेल्वे पोलीस स्टेशन, बांधकाम विभागाचे कार्यालय व पार्किंग परिसरात शिरल्याने प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली.

बडनेरा रेल्वेस्थानक जलमयबडनेरा : सोमवारी रात्री बरसलेल्या मूसळधार पावसाचे पाणी बडनेरा रेल्वे स्थानकातील तिकिट घर, रेल्वे पोलीस स्टेशन, बांधकाम विभागाचे कार्यालय व पार्किंग परिसरात शिरल्याने प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. ड्रेनेज चोकअप झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचे पाणी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात साचले होते. नव्यावस्तीच्या बाजूला असलेल्या तिकिट घरासमोर पाणी साचल्याने प्रवाशांना तिकिट काढताना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. त्याचप्रमाणे स्टेशन समोरच्या पार्किंगमध्ये सर्वत्र पाणी साचले होते. आबालवृद्धांना यामुळे प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. प्रवाशांना रेल्वे स्थानकात शिरणे कठीण झाले होते. अनेक प्रवासी पाण्यात पडले सुद्धा. रेल्वे पोलीस ठाण्यातही गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन डायरी रूम, कंट्रोल रूम, लॉकअपमध्ये पाणी साचले होते. यामुळे रेल्वे पोलिसांना तसेच प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे पोलीस ठाण्याला लागूनच सिनिअर सेक्शन इंजिनिअर (वर्क्स) यांचे कार्यालय आहे. त्या ठिकाणाला देखील जलाशयाचे स्वरूप आले होते. या कार्यालयाकडे स्टेशन परिसरात पाणी साचू न देण्याची जबाबदारी आहे, हे विशेष. मात्र, या कार्यालयालाच पाण्याचा वेढा पडला होता.मील चाळ झोपडपट्टीत पाणी शिरलेबडनेरा : ही परिस्थिती दरवर्षीच निर्माण होते. पाणी वाहून नेणारे ड्रेनेज सारखे चोकअप होत असल्यामुळे या परिसरातील पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळेच साचून राहते. याहीवेळी बराच वेळानंतर ड्रेनेज स्वच्छ केल्यावर साचलेले पाणी मोकळे झाले. रेल्वे स्थानकात पाणी साचणार नाही, असे नियोजन रेल्वे प्रशासनाने करावे, अशा प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत. नव्या वस्तीत रेल्वे ट्रकला लागूनच मिलचाळ झोपडपट्टी आहे. सोमवारी रात्री या झोपडपट्टीत पाणी शिरले. झोपडपट्टीवासीयांची मोठी तारांबळ उडाली. घरातील किंमती वस्तू पाण्यात सापडल्या. ही झोपडपट्टी खोलगट भागात आहे. लागूनच रेल्वे ट्रॅकखालून सांडपाणी वाहून जाणारे ड्रेनेज आहे ते बुजले होते. महानगरपालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी येथे पोहोचले. नगरसेवक प्रकाश बनसोड, मनपाचे सहायक आयुक्त योगेश पिठे, स्वास्थ निरीक्षक एकनाथ कुलकर्णी, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड, नायब तहसीलदार धीरज मांजरे, तलाठी भगत, हे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)कॅन्टीनचा केरकचरा पडतो ड्रेनेजमध्येरेल्वे तिकिट घराजवळ एक कॅन्टीन आहे. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर विकण्यासाठी खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. या कॅन्टीनसमोरुनच ड्रेनेज गेले आहे. कॅन्टीनचा केरकचरा सरळ या ड्रेनेजमध्येच टाकण्यात येत असल्याची ओरड आहे. घुशींनी येथील ड्रेनेजला भगदाडे पाडली आहेत. या सर्व बाबींकडे रेल्वे प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.