शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, बडनेरा स्थानकावर प्रवाशांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:14 IST

मुंबईनजीकच्या आसनगाव ते वाशीदरम्यान मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दुरंतो एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरल्याने ....

ठळक मुद्देदुरंतो घसरली : मुंबई एक्स्प्रेससह चार गाड्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : मुंबईनजीकच्या आसनगाव ते वाशीदरम्यान मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दुरंतो एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरल्याने अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून जाणाºया व येणाºया काही प्रवाशी गाड्या रद्द, तर काही रखडल्या आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºया प्रवाशांची ऐनवेळेवर धावपळ उडाली. ज्येष्ठा गौरी स्थापनेच्या दिवशीच ही घटना घडल्याने याचा अधिक मन:स्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.दुरंतो एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने मंगळवार २९ रोजी सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली. तसेच अमरावती-मुंबई व सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यातत. तसेच नागपूर-मुंबई-दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याची माहिती बडनेरा स्टेशनचे प्रबंधक आर.डब्ल्यू. निशाने यांनी दिली. सोमवारी रात्री निघालेली नागपूर-दादर एक्स्प्रेस नाशिकपर्यंत गेली. नागपूरकडे येणारी गितांजली एक्स्प्रेस उशिराने धावली. त्याचप्रमाणे इतरही गाड्या उशिराने धावल्यात. मात्र भुसावळपर्यंत जाणाºया पॅसेंजर गाड्या वेळेवर धावल्यात. ज्येष्ठा गौरी ज्या दिवशी बसतात त्याच दिवसावर या गाडीचे डबे घसरल्याने इतरही प्रवासी गाड्यांवर याचा परिणाम झाला. पर्यायाने अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकाहून प्रवास करणाºया व इकडे येणाºया प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. ऐनवेळेवर रद्द झालेल्या गाड्यांचे रिझर्वेशन रद्द करून प्रवास कसा करावा, या द्विधा मन:स्थितीत प्रवासी सापडले होते. ज्या गाडीचे डबे घसरलेत त्या गाडीत काही अमरावतीचे प्रवासीदेखील होते. सुदैवाने कुणालाच दुखापत झालेली नाही, अशी माहिती आहे. लवकरच दोन्ही बाजूने धावणाºया प्रवाशी गाड्या सुरळीत धावतील, अशी माहिती आहे.