शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन कार्यालयात ‘जी फार्म’चा बोलबाला

By admin | Updated: July 16, 2014 23:49 IST

येथील प्रादेशिक परिवहन विभागात पैसे दिल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लर्निंग) देणाऱ्या विभागात तर दलाल म्हणतील

अमरावती : येथील प्रादेशिक परिवहन विभागात पैसे दिल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लर्निंग) देणाऱ्या विभागात तर दलाल म्हणतील त्यांचीच कामे अगोदर होत असल्याचे चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वसुलीकरिता ‘सुमित’ नामक दलालाची नियुक्ती केली असून येथे ‘महाजनी’ कारभार सुरु आहे.आरटीओंचा कारभार हा वरवर कागदोपत्री दिसत असला तरी या कागदावरच सर्व काही दडले आहे. या कार्यालयात प्रत्येक कामांचे आणि व्यवहाराचे कोड ठरले आहे. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दलालांकडून कामांचे पैसे मागायचे झाल्यास ‘जी फार्म’ हा शब्द प्रयोग केला जातो. या ‘जी फार्म’ शब्द प्रयोगाचा परवाना विभागात वापर केला जात आहे. लर्निंग विभागात अधिकाऱ्यांनी अपहार करताना कोणतेही गंडातंर येऊ नये, यासाठी सुमित नामक दलालाची खास नेममूक केली आहे. येथे काही महिन्यांपासून एकाच अधिकाऱ्याची कर्तव्यावर नेमणूक होत असल्याने या अधिकाऱ्याने परवान्याची वसुली करण्यासाठी दलाल नेमला आहे. कोणालाही परवान्याचे काम झाल्यानंतर सुमितकडे रक्कम जमा करावी लागते. एकदा ‘जी फार्म’ जमा झाले की, त्यानंतरच परवाना मंजूर केला जातो. अन्यथा त्रुट्या काढून परवान्यासाठी आलेला अर्ज नामंजूर केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. ‘जी फार्म’शिवाय कोणत्याही व्यक्तीचे परवाने मंजूर करायचे नाही, असे फर्मान ‘महाजनी’ अधिकाऱ्यांनी काढला आहे. लर्निंग विभागात दरदिवशी ‘जी फार्म’चे २० ते २५ हजार रुपयांची रक्कम एकट्या या अधिकाऱ्याच्या खिशात जात असल्याची माहिती आहे. आरटीओत २५० ते ३०० दलालांची संख्या आहे. त्यानुसार प्रत्येकाचे दोन ते तीन लर्निंग परवाने आल्याशिवाय राहत नाही. आरटीओत दलालाशिवाय कामे होत नसल्याने या कार्यालयाचे हेलपाटे खाण्यापेक्षा एकदा पैसे गेले तर चालेल, अशी मन:स्थिती येथे कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे आरटीओत दलालाची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येते. लर्निंग विभागात सुरु असलेल्या महाजनी कारभाराने सामान्यांना मोठा त्रास सहन करुन जादा पैसे मोजावे लागत आहे.