शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्टार बसेसवरून परिवहन समिती सदस्य आक्रमक

By admin | Updated: March 27, 2015 00:01 IST

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी उत्थानांतर्गत महापालिकेला मंजूर स्टार बसेस तपासणीसंदर्भात गुरुवारी ...

अमरावती : केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी उत्थानांतर्गत महापालिकेला मंजूर स्टार बसेस तपासणीसंदर्भात गुरुवारी आयोजित सभेत परिवहन समिती सदस्य प्रशासनाच्या एककल्ली काराभाराविरुद्ध प्रचंड आक्रमक झालेत. स्टार बस अमरावतीत आल्यानंतर सदस्यांना माहिती दिली जात नाही, हे शल्य व्यक्त करीत सदस्यांनी सभा स्थगित केली.स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात परिवहन समितीच्या सभापती दिव्या सिसोदे यांच्या अध्यक्षस्थानी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कांचन ग्रेसपुंजे, दीपमाला मोहोड, वनिता तायडे, सविता लाडेकर, जयश्री मोरे, अ. रफीक, रहिमाबी सादिक आयडीया आदी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी वाहन कार्यशाळा विभागाचे दिलीप पडघन, स्वप्नील जसवंते यांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्टार बसेसची तपासणी करुन घेणे आवश्यक असल्याची बाब उपस्थित केली. मान्यताप्राप्त संस्थेकडून ६४ बसेसची तपासणी अनिवार्य असून त्याकरिता ७ लाख २१ हजार ३५१ रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या प्रस्तावाला बाजूला ठेवत महिला सदस्य आक्रमक झाल्यात. स्टार बसेस निविदा प्रक्रिया, नियमावली, बस शहरात आल्यानंतर माहिती दिली जात नाही, या विषयावर सभा गाजली. यावेळी अधिकाऱ्यांना सुद्धा सदस्यांना व्यवस्थित माहिती देता आली नाही, हे विशेष. स्टार बस अमरावतीत आली असताना ती सदस्यांना प्रत्यक्ष दाखविता आली नाही. स्टारबस ही अमरावतीची नसून ठाणे महापालिकेची होती, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे सभापती दिव्या सिसोदे यांच्यासह अन्य महिला सदस्य आक्रमक झाल्यात. बस अमरावतीत प्रात्यक्षिकासाठी आली असताना ती का बरं दाखविण्यात आली नाही, यावरुन ताशेरे ओढण्यात आले. वाहन कार्यशाळा विभागातील अधिकारी हे सकारात्मक उत्तर देण्यास असमर्थनीय असल्याचा आरोप करुन सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढील सभेत सदस्यांच्या मागणीनुसार आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच पुढील विषयाला मंजुरी दिली जाईल, असे सर्वानुमते ठरले. बसेस तपासणीचा प्रस्ताव फेटाळत योग्य ती माहिती दिल्याशिवाय पुढे काहीही नाही, असे ठरवीत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. परिवहन समितीची पहिलीच सभा वादग्रस्त ठरल्याने जणू स्टार बसेसला ग्रहण तर लागणार नाही, असे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)