अमरावती : बालगृहातील मुली खासगी मालमत्ता असल्यागत त्यांच्याशी वागणारा तपोवनच्या पदावनत सचिवाचा मुलगा अजिंक्य श्रीराम गोसावी याचे अनेक धक्कादायक किस्से 'लोकमत'च्या शोधमोहिमेत उघड होत आहेत. पुण्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी असलेल्या अजिंंक्यने तपोवनतील अनाथ मुलींचे कधिही शोषण करता यावे यासाठी तपोवन परिसरात्लगतच्या वस्तीत भाड्याने खोली घेतली होती. रात्री बेरात्री, वाट्टेल तेव्हा तो बालगृहात प्रवेश करायचा. ‘पॉवर’चा गैरवापरअमरावती : त्याच्या इच्छेप्रमाणे तो बालगृहातील मुलींना त्याच्या खोलीत घेऊन जायचा. मुलींच्या असहायतेचा लाभ घेऊन स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागण्यास त्याने एकदा का एखाद्या मुलीला बाध्य केले की नंतर तो त्यांना वारंवार वापरायचा. 'लोकमत'च्या हाती आलेल्या माहितीनुसार, अजिंंक्य पुण्याकडील मित्रांनाही मौजमजेसाठी अमरावतीत आणायचा.वडील श्रीराम गोसावी हे सचिव असल्याचा पुरेपूर गैरफायदा तो घेत होता. वडीलांची मूकसंमती असल्यानेच त्याचे धारिष्ठ्य वाढत गेले. त्याला रोखण्याची हिम्मत वसतिगृह अधीक्षक गजानन चुटे याने कधीच केली नाही. संस्थेचे सचिव असताना दैनंदिन कामकाजाची अधिकृत जबाबदारी असलेले तपोवनचे सचिव श्रीराम गोसावी यांनी मुलींचे लैंगिक शोषण होऊ दिले. मुलालाही रान मोकळे करून दिले. तक्रारी नष्ट केल्यात. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन अॅक्ट'ची पायमल्ली केली. मुलींचे रक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सचिवानेच त्यांच्या शोषणाला बळ दिले. वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. गोसावी हे दोषी असल्याचे लक्षात आल्यामुळे पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली; तथापि गोसावी यांच्याविरुद्ध नियामक मंडळाने वा अध्यक्षाने पोलीस तक्रार का दाखल केली नाही? अध्यक्ष राठी यांना तशी गरज का वाटली नाही? दाजीसाहेबांच्या सुवर्णकार्याने तेजोमय झालेल्या तपोवनात अक्षम्य गुन्हे घडवून आणणाऱ्या गोसावीला अध्यक्ष पाठीशी का घालताहेत?
अजिंक्यने घेतली होती भाड्याची खोली!
By admin | Updated: December 27, 2014 00:35 IST