शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची झोप उडाली!

By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST

महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच चंद्रकांत गुडेवार यांनी उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पावले उचलली असून..

एलबीटी वसुलीसाठी नोटीस : व्यापारी लोकप्रतिनिधींच्या दारीअमरावती : महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच चंद्रकांत गुडेवार यांनी उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पावले उचलली असून स्थानिक संस्था कर (एलबीटी), थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी व्यापाऱ्यांना नोटीस पाठविल्या आहेत. यामुळे शहरातील व्यावसायिकांची झोप उडाली आहे. एलबीटीतून मुक्ती मिळावी, यासाठी येथील व्यावसायिक आता लोकप्रतिनिधींना साकडे घालत आहेत.राज्य शासनाने अभयदान योजना सुरु करुन व्यापाऱ्यांसाठी दंडात्मक रक्कमेसह व्याजदराची शुल्क माफी करण्याची घोषणा केली. मात्र, याबाबतचे आदेश अद्याप महापालिकेत पोहोचले नाहीत. दुसरीकडे आयुक्तांनी जकातच्या दरात एलबीटीचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जुलै २०१२ ते १ एप्रिल २०१४ या दरम्यान फरकाची रक्कम वसूल करण्यासाठी एलबीटी विभागामार्फत नोटीस पाठविल्या आहेत. या नोटीस प्राप्त होताच स्थानिक व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. तीन दिवसांपूर्वी येथील चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन, घनश्याम राठी आदी पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी कणखर भूमिका घेतली आहे. एलबीटी वसुलीवर ‘स्टे’ आणू- पालकमंत्रीमहापालिका आयुक्त गुडेवार यांनी सक्तीने एलबीटी वसुली सुरु केली असली तरी शासन निर्णयानुसार तसे करता येणार नाही. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात ठेऊन एलबीटी सक्तीने वसूल करण्याच्या निर्णयावर शासनाकडून स्थगनादेश आणू, अशी हमी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. रविवारी एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर २५ वर्षांत महापालिकेने एमआयडीसी परिसरात कोणती विकास कामे केलीत, याचा लेखाजोखा मागविला जाईल, असेही ना.पोटे म्हणाले.शासनाच्या आदेशांचे पालन करू - आयुक्तएलबीटी संदर्भात शासनाने लेखी स्वरुपात काहीही कळविले नाही. शासन अध्यादेश आल्यास प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल. शासनाने एलबीटी वसुली रोखल्यास ते आदेश मान्य करुन कार्यवाही करणार. मात्र, तूर्तास शासनाचे काहीही आदेश नसल्याने पूर्वीच्या आदेशांचेच पालन केले जाईल, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.