शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

टॉवर्सधारक, बड्या संस्थांचा ‘टॅक्स’ला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:02 IST

महापालिका क्षेत्रातील बड्या संस्था, टॉवर्सधारक, महसूल विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटी रूपये मालमत्ता कर थकविल्याची बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्दे४ कोटी रूपये थकीत : व्हीएमव्हीने थकविले २७ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रातील बड्या संस्था, टॉवर्सधारक, महसूल विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी तब्बल ४ कोटी रूपये मालमत्ता कर थकविल्याची बाब उघड झाली आहे. कर वसुलीचा घटलेला टक्का पाहता आता हे बडे थकबाकीदार लक्ष्य करण्यात येणार आहेत.७ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणाºया महापालिकेची आर्थिक मदार मालमत्ता करावर आहे. तथापि, मागील काही वर्षांची तुलना केल्यास मागणी आणि वसुलीत २० टक्क्यांची तफावत असते. सुमारे ७० ते ७५ टक्के कर वसुली प्रत्यक्षात होते.ही टक्केवारी १०० टक्के होण्यासाठी नगरविकासने निर्देश दिले आहेत. संपूर्ण वसुलीसाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश देऊन प्रत्येक प्रभागातील बड्या १०० मालमत्ताधारकांची यादी तयार करून त्यांच्याकडील थकबाकी वसूल करण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने थकीत मालमत्ता धारकांच्या याद्यांवर अंतिम हात फिरवणे सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून शहरातील बड्या शैक्षणिक संस्था, टॉवर्सधारक आणि महसुली विभाग महापालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचे मर्यादित उत्पन्नाचे स्त्रोत पाहता मालमत्ता कर वसुलीशिवाय पर्याय नाही. तथापि बडे थकबाकीधारक कराची रक्कम भरण्यास पुढे येत नसल्याने यंदा त्यांच्यावर कारवाई व दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय व वसाहतींकडे मोठी थकबाकी असल्यास जिल्हाधिकाºयांची मदत घेऊन त्यासाठी पत्रव्यवहार करावा व शतप्रतिशत वसुली करावी, त्यावरच अनुदानाची रक्कम अवलंबून असेल, अशी तंबीही नगरविकासने दिली आहे. त्या पार्श्वभूमिवर बड्या थकबाकीदारांची यादी झोनस्तरावर बनविली जात आहे. तूर्तास एकट्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेकडे २७ लाख रूपये थकीत आहे. विभागीय कर्मचारी वसाहतीवर ३४.१५ लाख रूपये थकीत आहे. बड्या थकबाकीदारांमध्ये टॉवर्सधारक आणि शैक्षणिक संस्थाचा टक्का अधिक आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची मागणी ४५ कोटी एवढी असून त्यापैकी ३ नोव्हेंबरपर्यंत २७ टक्के वसुली झाली आहे.हे आहेत बडे थकबाकीधारकशासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था २१.७३ लाखविमवि संस्था गृहशास्त्र विभाग ५.१२ लाखबीएसएनएल ६.६१ लाखजिल्हाधिकारी निवास २.२९ लाखबी अ‍ॅन्ड सी शासकीय वसाहत ६.१७ लाखविभागीय आयुक्त कर्मचारी वसाहत ३४.१५ लाखएनएनसी भवन १३.२७ लाखकलंत्री/जीटीएल टॉवर ७.०७ लाखछबीलदास लाठीया १४.०१ लाखएचव्हीपीएम २.७४ लाखअडाणेश्वर संस्थान १२.५० लाखकिशोर मंत्री ३.१० लाखविदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय २०.३३ लाखसंत कंवरराम शाळा १३ लाखसंजय प्रमोद देशमुख ६.२९ लाखरिलायंस टॉवर (येते) ७.०७ लाख