गणेश वासनिक अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या ‘ओशो रजनीश आश्रम’ परिसराला निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.पोहरा वनवर्तुळांतर्गत इंदला बीट सर्वे.क्र.३५ मध्ये काही वर्षांपूर्वी शेतीचे काम करण्याच्या नावाखाली ‘ओशो रजनीश’ आश्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निसर्गाच्या सान्निध्यातील या आश्रमात कालांतराने गैरकृत्ये होत असल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी धाडसत्र राबवून येथे वारंवार कारवाया केल्यात. काही वर्षांनी हा आश्रम पोलिसांनी बंद पाडला. आश्रमाची इमारत कालांतराने ओस पडली. वनविभागाच्या उत्पन्नात पडणार भरअमरावती : यापैकी एका इमारतीचे बांधकाम वनविभागाच्या जमिनीवर असल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे ही इमारत वनविभागाने ताब्यात घेतली आहे. मोहित करणाऱ्या निसर्गदृश्यांची रेलचेल पोहरा जंगलात असल्यामुळे वनविभागाने तलाव असलेला हा परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंगर पायथ्याशी पसरलेली हिरवळ, तलाव, वन्यपशुंचा वावर या विविध बाबी पोषक असल्यामुळे हा उपक्रम वनविभागाच्या उत्पन्नात भर पाडणारा ठरणार आहे. दरम्यान या परिसरात ये-जा करण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. निसर्गाच्या कुशीत असलेला हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याने ही बाब पर्यटकांना निश्चितच सुखावणारी आहे.पोलिसांमुळे गैरप्रकारांना आळापोहरा जंगलात निसर्गाच्या कुशीत असलेल्या यापूर्वीच्या ‘ओशो आश्रमा’त काही वर्षांपूर्वी चालत असलेल्या वाममार्गाला पोलीस कारवाईनेच आळा घातला आहे. सतत पोलिसांची गस्त, अटकसत्र राबवून येथे ये-जा करण्यावर कायदेशिर कारवायांमुळे लगाम लावण्यात आला, हे विशेष.दोन किमी. रस्ता निर्मितीत अटी, शर्थीचे बंधनराखीव वनक्षेत्र असलेल्या पोहरा जंगलातील आश्रमस्थळ परिसरात सन २०१४ मध्ये अटी, शर्थींच्या अधिन राहून दोन किमी. रस्ता निर्मितीला मंजुरी दिली होती. वन्यपशुंचा वावर असताना या रस्त्यामुळे त्रास होणार नाही, ही काळजी घेण्यात आली होती. चहुबाजुने वनजमीन असताना मध्यंतरी शेती असल्याने वहिवाटीच्या रस्ता निर्मितीला त्यावेळी मान्यता दिल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोहरा जंगलातील ‘त्या’ आश्रम परिसरात होणार पर्यटनस्थळ
By admin | Updated: October 12, 2015 00:22 IST