शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

२०२ गावांना कृषी संजीवनीचे टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:14 IST

लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे.

ठळक मुद्देहवामानाकुल पीकपद्धती : पहिल्या टप्प्यात १२ गावसमूह, ३३ गावसमित्या स्थापित

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे. यामध्ये खारपाणपट्यामधील ३५६, तर दुष्काळजन्य असणाऱ्या १७६ गावांचा समावेश आहे.पोखरा प्रकल्पात लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत गावसमूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३३ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापित करण्यात आल्या. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी, कृषिमूल्य साखळीमध्ये सहभाग, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती होण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.शेतीसाठी या घटकांवर भरक्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी-विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकूल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.शेतीवर उपजीविका असणाऱ्यांना लाभकेवळ शेतीवर उपजीविका असलेल्या अत्यल्प व अल्प भूधारकांना आणि भूमिहीन शेतमजुरांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. प्रथम अत्यल्प भूधारक व निधी शिल्लक राहिल्यास अल्पभूधारकाची निवड करण्यात येणार आहे.पाण्याचा कार्यक्षम, शाश्वत वापरमूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन व संरक्षित सिंचन सुविधेवर भर देण्यात येणार आहे.हवामानाकुल शेती पद्धतीहवामानानुकूल कृषी पद्धतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेतीसह एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे.काढणीपश्चात व्यवस्थापनशेती उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, क्षमता बांधणी, बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्त्वावर कृषी औजारे केंद्र-सुविधा निर्मिती करण्यात येणार आहे.