शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी अचलपुरात टोकन पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:06 IST

अनिल कडू परतवाडा : कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात टोकन पद्धती राबविण्यात येत ...

अनिल कडू

परतवाडा : कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात टोकन पद्धती राबविण्यात येत आहे.

लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिली जात आहे. केंद्रावर लस उपलब्ध होताच दिवस, वेळ आणि तारीख वैद्यकीय यंत्रणेकडून त्यांना कळविली जात आहे. दिलेल्या दिवसावर नागरिक केंद्रावर येऊन लस घेत आहेत. यातून लसीकरणाकरिता केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी टळली आहे. नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रावरील नागरिकांची रांग यातून नाहीशी झाली आहे.

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांच्या कल्पकतेतून ही टोकन पद्धती अमलात आली असून, ती चोख राबविली जात आहे. याकरिता त्यांनी साध्या पृष्ठांच्या चाळीस पेट्या तयार ठेवल्या आहेत. यातील काही पेट्यांवर कोविशिल्ड व काही पेट्यांवर कोव्हॅक्सिन या लसींची नावे लिहिली आहेत. सोबतच लसींचा पहिला डोज, दुसरा डोज या विषयी माहिती पेट्यांवर अंकित आहे.

लस घेण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर प्रवेश घेतेवेळी दर्शनी भागात बाहेरच या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्यांच्या बाजूला कोऱ्या कागदांचे तुकडेही ठेवले गेले आहेत. आलेले व येणारे नागरिक या कागदावर आपले नाव, मोबाईल नंबर व शक्य असल्यास आधार नंबर लिहून ती चिठ्ठी, डोजनुसार जी लस हवी असेल त्या, पेटीत टाकून निघून जातात. दर तासाला या पेट्या उघडल्या जातात. त्यातील चिठ्ठ्याची नोंद केंद्रावरील रजिस्टरला घेतली जात आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर फोनद्वारे कळवून केंद्रावर लस घेण्याकरिता बोलावण्यात येईल. असे त्या चिठ्ठीतील मोबाईल नंबरवर आरोग्य यंत्रणेकडून कळविले जात आहे. यातून संबंधित नागरिकास आपली चिठ्ठी योग्य ठिकाणी पोहोचली असल्याची व आता आपल्याला लस मिळणार असल्याची हमी मिळाली आहे. केंद्रावर येणाऱ्यांची व आलेल्यांची संख्या पाहून ठेवल्या जाणाऱ्या पेट्यांची संख्या कमी-अधिक केली जाते, हे विशेष.

टोकन पद्धती लक्षवेधक

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पहिल्या डोजकरिता १८००, तर दुसऱ्या डोजकरिता ६०० लोक प्रतीक्षेत आहेत. केंद्रावर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे केवळ ज्यांचा लसीचा दुसरा डोज आहे, अशांनाच दुसरा डोज घेण्याकरिता केंद्रावर बोलाविल्या जात आहे.

केंद्रावरील कोव्हॅक्सिन लस संपली आहे. अनेक लोक या लसींच्या प्रतीक्षेत आहेत. या केंद्रांवर केवळ कोविशिल्डचाच दुसरा डोज दिला जात आहे. लसीकरणाचा पहिला डोज देणे थांबविण्यात आले आहे. यादरम्यान डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या अभिनव अशा टोकन पद्धतीतून केंद्रावर होऊ शकणारी संभाव्य गर्दी ओसरली आहे. ही टोकन पद्धती लक्षवेधक ठरली आहे.