शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

रेल्वे ट्रॅकवर सोडली जाते शौचालयातील घाण

By admin | Updated: October 27, 2015 00:18 IST

स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे.

टाके ओव्हरफ्लो : प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, तक्रार नोंदवूनही कार्यवाही शून्य बडनेरा : स्वच्छ व सुंदर भारत’ या ब्रीद वाक्याला रेल्वे प्रशासनाकडूनच फाटा दिला जात असल्याचा प्रत्यय प्रवाशांना बडनेरा रेल्वे स्थानकावर येत आहे. प्रतीक्षालयाच्या शौचालयाचे टाके घाणीने भरले आहेत. ही घाण थेट रेल्वे ट्रॅकवर सोडली जात असल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निमार्ण झाला आहे. येथील रेल्वे स्थानक ‘जंक्शन’ म्हणून भारतभर नावारुपास आले आहे. येथून दरदिवसाला बऱ्याच प्रवासी गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातात. त्यामुळे मोठा प्रवाशी वर्ग येथून प्रवास करतो. रेल्वे स्थानकाची व्याप्ती लक्षात घेता रेल्वे प्रशासनानेदेखील या रेल्वेस्थानकाचा कायापालट केलेला आहे. परंतु धोकादायक विषयाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्लॅटफार्मवरील प्रतीक्षालयाच्या शौचालयाचे टाके घाणीने भरले आहे. ही घाण सरळ रेल्वे ट्रॅकवर सोडली जात आहे. प्रवाशांनी याची लेखी तक्रार रेल्वे स्थानकाच्या तक्रार पुस्तिकेत केली आहे. गेल्या महिन्यापासून शौचालयाचे टाके स्वच्छ करण्यात आलेले नाही.एस.सी.जैन व अनिल जैन नामक प्रवाशाने या शौचालयाच्या घाणीची तक्रार संबंधितांकडे दिली आहे. शौचालयाचे हे टाके भरल्याची बाबदेखील येथील स्टेशन मास्तर व संबंधित सेक्शन इंजिनिअरिंग विभागाला सांगण्यात आल्याची माहिती आहे. महिनाभरात तीनदा माहिती देऊनही शौचालयाचे टाके स्वच्छ करण्यात आलेले नाहीत. नाईलाजास्तव घाण प्लॅटफार्मवर पसरू नये, यासाठी ट्रॅकवर ती सोडली जात आहे. यामुळे प्रवासीवर्गाला मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.एकीकडे सरकार ‘स्वच्छ व सुंदर भारत’ या अभियानावर भर देत आहे. रेल्वे स्थानक, रेल्वे गाड्यांमध्येदेखील स्वच्छता ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयातील शौचालयाची अवस्था पाहून या अभियानाला त्यांच्याकडूनच फाटा दिला जात असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे विभागाद्वारे प्रवाशांना अद्ययावत सुविधा पुरविण्यावर नेहमीच भर दिला जातो. परंतु घाणीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा का दिला जात नाही?, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. शौचालयाचे टाके स्वच्छ करावे, अशी मागणी केली जात आहे.