शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:53 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

ठळक मुद्देथेट सरपंचाची होणार निवड : मतदान साहित्य गावागावांत पोहोचले

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये रविवारी मतदान साहित्य पोहचले आहेत.जिल्ह्यात एकूण २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी पाच ग्रामपंचायती अविरोध आल्यामुळे २५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहेत. यावेळी सरपंचपद प्रथमच थेट जनतेमधून असल्यामुळे निवडणुकीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. २४९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी बहुरंगी लढत आहे. ५०७ सदस्यपदांची अविरोध निवड झाल्याने उर्वरित १,४६१ सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तालुका व पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आहे. निवडणूक प्रक्रियेवर एसडीओ, तहसीलदार यांची कडी नजर आहे.अचलपूर तालुक्यात २३, चिखलदरा २९, चांदूरबाजार २५, दर्यापूर २०, अंजनगाव १३, चांदूररेल्वे १७, वरूड २३, मोर्शी २४, तिवसा १२, धामणगाव ८, नांदगाव १७, धारणी १८, अमरावती १२, भातकुली ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.अमरावती तालुक्यात ९९, भातकुली ८७, नांदगाव खंडेश्वर ११५, तिवसा ९०, चांदूररेल्वे १३१, धामणगाव ५२, दर्यापूर १२५, अंजनगाव सुर्जी ९५, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७१, मोर्शी १८६, वरूड १७८, धारणी १००, तर चिखलदरा तालुक्यातील १३६ सरपंचांसह सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे.सोमवार १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.