शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तीन नगराध्यक्षपदांसाठी आज निवडणूक

By admin | Updated: July 21, 2014 23:36 IST

जिल्ह्यातील दहा पैकी तीन नगरपालिकांमध्ये २२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच चार नगरपालिकांमध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज

चार जागा अविरोध : उपाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली, राजकीय हालचालींना वेग अमरावती : जिल्ह्यातील दहा पैकी तीन नगरपालिकांमध्ये २२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच चार नगरपालिकांमध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या चारही ठिकाणी नगराध्यक्षांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार आहे. दोन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगनादेश दिल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नाही. चिखलदरा नगरपरिषद वगळता सर्व नगरपालिकांमध्ये उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या सर्व पालिकांमध्ये २२ जुलै रोजी मतदान होईल. यासाठी राजकीय नेत्यांसह प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे. दर्यापुरात उपाध्यक्षपदासाठी निवडणूकदर्यापूर येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवड २२ जुलै रोजी होणार आहे. एका स्वीकृत सदस्याचीही निवड केली जाईल. दर्यापुरात नगराध्यक्ष, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर न्यायालयाचा स्थगनादेश आल्याने आता मंगळवारी केवळ उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल.२० सदस्य संख्या असलेल्या दर्यापूर नगरपालिकेत काँग्रेस ९, नगरसुधार समिती ८, भाजप २ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. स्वीकृत सदस्य अशोकसिंह गहरवाल यांचे निधन झाल्याने स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. नगरपालिकेत काँग्रेस व नगरसुधार समितीच्या आघाडीची सत्ता होती. .अंजनगावात आज ठरणार नगराध्यक्ष, उपाध्यक्षअंजनगाव-सुर्जी येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे, तर उपाध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नगराध्यक्षपदासाठी हनिफाबी मो. शरीफ व शिवसेनेतर्फे लक्ष्मी येऊल निवडणूक रिंगणात आहेत. येथे एकूण सदस्य संख्या २५ असून काँग्रेस ११, काँग्रेस बंडखोर ३, सेना ९ तर भाजप व अपक्ष प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. उपाध्यक्ष पदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. एकूणच राजकीय हालचालींना वेग आला आहे.त्याच प्रमाणे प्रशासनानेही मतदानासाठी तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ हे काम सांभाळतील.