यंत्रणा सज्ज : १४ ठिकाणी सार्वत्रिक, ४८ पदांसाठी पोटनिवडणूकअमरावती : जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४८ सदस्य पदांकरिता शनिवार २५ जुलै रोजी मतदान होत आहे. १ सार्वत्रिक ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. ३ ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तसेच ४८ सदस्यपदांसाठी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाही, या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.सार्वत्रिक निवडणुकीत १९ सदस्य व पोटनिवडणुकीत ३४ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४८ पोटनिवडणूक असणाऱ्या सदस्यपंदासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ४७ मतदान केंद्र व त्याअंतर्गत ८० बुथ आहेत. सुरक्षा विषयक ९ झोन असून १४ ग्रुप अधिकारी आहेत. पोटनिवडणुकीमध्ये चिखलदरा २, धारणी १५, अचलपूर १, नांदगाव २, भातकुली ११, तिवसा ३, अमरावती २, दर्यापूर ६, चांदूरबाजार १, अंजनगाव २, वरुड २ व मोर्शी १ अशी पोटनिवडणुकीची सदस्यसंख्या आहे. निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)तीन ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज नाहीजिल्ह्यात १८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी नांदगाव तालुक्यातील शिरपूर येथे अविरोध निवडणूक झाली तर चिखलदरा तालुक्यात सोमठाणा, काकाझरी व अढाव या ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही.
ग्रामपंचायतींच्या १८४ सदस्य पदांसाठी आज निवडणूक
By admin | Updated: July 25, 2015 00:09 IST