शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन

By admin | Updated: January 17, 2017 00:08 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण : त्रिसदस्यीय पथक दाखल, २००० गुणांची परीक्षाअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती महापालिका परीक्षार्थी म्हणून सहभागी झाली आहे. शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन तपासणीसाठी क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया ‘क्युसीआय’ची टिम १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती येत असून त्यानिमित्ताने पालिकेने जोरदार तयारी केली आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रक्रिया अशा विविध घटकांवर ‘स्वच्छ’ शहराचे नामांकन ठरणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पालिकेने जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह शहर स्वच्छता, बायोगॅस, आर्गेनिक वेस्ट प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनचे ‘सिनिअर अ‍ॅसेसर चारूदत्त पाठक व अन्य दोन अधिकाऱ्यांची क्युसीआयचे पथक मंगळवारी सकाळी शहरात दाखल होईल. तीन दिवसीय दौऱ्याचा मंगळवार पहिला दिवस आहे. पाठक हे महापालिकेत बसून स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्प व अनुषंगिक सर्व ‘डाक्युमेंटेशन’ची पाहणी करणार आहे तर त्यांचे दोन सहकारी प्रत्यक्षात ‘स्पॉट व्हिजिट’ करतील. १७ ते १९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या स्पॉट व्हिजिट आणि डॉक्युमेंटेशनवर देशातील ५०० शहरांमधील अमरावतीचे नामांकन ठरणार आहे. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी याबाबतची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)आरोग्य अधिकाऱ्यांकडे जबाबदारीशहरातील रस्ते, साफसफाई, सर्व्हिस लेन, गटारी खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. त्याअनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यावरही अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छता विषयक धुरा सोपविली आहे.आगार, रेल्वे व्यवस्थापकांना पत्रस्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत केंद्रीय पथकाद्वारे शहरातील स्वच्छताविषयक व दैनंदिन साफसफाईची पाहणी केली जाईल. या अनुषंगाने मध्यवर्ती बसस्थानकासह बडनेरा आणि अमरावती रेल्वेस्टेशन, मास्टर्सला पत्र देण्यात आले आहे. १७ ते १९ दरम्यान होणाऱ्या या पाहणी दौऱ्यादरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासह अमरावती व बडनेरा रेल्वे स्टेशनची विशेष स्वच्छता ठेवावी, असे पत्र महापालिकेद्वार करण्यात आले आहे.