शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांसह दोन सभापतींना आज खातेवाटप

By admin | Updated: April 18, 2017 00:22 IST

जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींची निवडणूक ३ एप्रिल रोजी आटोपली. आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद : आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तबअमरावती : जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींची निवडणूक ३ एप्रिल रोजी आटोपली. आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन विषय समितीच्या सभापतींना मिळणारे खाते जवळपास निश्चित झाले आहे. याची घोषणा मंगळवार १८ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षांद्वारे केली जाईल. जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने सत्ता मिळविल्यानंतर चार विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही वर्चस्व अबाधित राखले आहे. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समितीचा अपवाद वगळता उपाध्यक्ष व अन्य दोन विषय समिती सभापतींना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नाही. त्यामुळे या तिनही पदाधिकाऱ्यांना खातेवाटप करण्यासाठी मंगळवारी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. यासभेत अध्यक्ष नितीन गोंडाणे हे खातेवाटपाची रितसर घोषणा करतील.खाते न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख आणि बळवंत वानखडे यांचा समावेश आहे. यातीन पदाधिकाऱ्यांना कोणते खाते मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र, काँग्रेस व मित्रपक्षांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या खात्यांवर आधीच शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. त्यामुळे यासभेत खातेवाटपाची केवळ औपचारिक घोषणाच अध्यक्ष करणार आहेत. जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समिती आहेत. यामध्ये स्थायी, जलव्यस्थापन समितीचे पदसिद्ध सभापती अध्यक्षच आहेत तर समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागाच्या सभापतींकडे अगोदरच सोपविण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींकडे जी खाती सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सोपवतील त्य समितीचे सभापती म्हणून आजपासून कामकाज सांभाळणार आहेत.खातेवाटपादरम्यान बदलांची शक्यतानव्याने निवड झालेल्या उपाध्यक्षांसह दोन विषय समिती सभापतींना खातेवाटप करताना ऐनवेळी काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, बांधकाम, वित्त व आरोग्य खात्याचा सामावेश असेल. खातेवाटप करताना शासन धोरणानुसार कृषी व पशुसंवर्धन, स्थायी व जलव्यवस्थापन समितीचे खाते बदलता येत नसल्याने ही जोडी अभेद्य राहिल.असे आहे संभाव्य खातेवाटपझेडपीचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर विषय समितीवर निवड झालेले काँग्रेसचे जयंत देशमुख यांना शिक्षण व बांधकाम खाते मिळण्याची शक्यता आहे. रिपाइंचे बळवंत वानखडे यांना वित्त व आरोग्य खाते सोपविले जाऊ शकते.