शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफाॅर्म तिकीटसाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफाॅर्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, आप्तस्वकीयांची होणारी गर्दी रोखण्यासाठी आता प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले. रेल्वे बोर्डाच्या या नव्या आदेशाची अंमलबजवाणी ११ मार्चपासून होत आहे. भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे ५ मार्च रोजी पत्र धडकले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफाॅर्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे. अगोदर प्लॅटफाॅर्म तिकीटसाठी १० रुपये मोजावे लागत होते, आता गुरुवारपासून ५० रुपये मोजावे लागतील. प्लॅटफाॅर्मशिवाय फलाटावर प्रवेश केल्यास रेल्वे नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आरपीएफने स्पष्ट केले आहे.  प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये केल्याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याऐवजी प्रवेशद्वारावर नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती असावी, असा सूर उमटत आहे. ५० रुपये प्लॅटफाॅर्म तिकीट करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक   होत असल्याची भावना सामान्यांची आहे. कोरोना काळात प्लॅटफाॅर्म तिकीट महागडे करुन काय साध्य करणार असा सवाल उपस्थित होत आहे.

या रेल्वे स्थानकांवर लागेल प्लॅटफाॅर्म तिकीट

बडनेरा, अमरावती, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, खंडवा.

प्लॅटफाॅर्म तिकीट दरवाढीचा निर्णय अन्यायकारक आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले जाईल आणि प्लॅटफाॅर्म तिकीट पूर्वीप्रमाणेच १० रुपये करावे, अशी मागणी केली जाईल.- नवनीत राणा, खासदार

प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करणे हा सामान्य प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन पाठवून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करेल. - अनिल तरडेजा, यात्री महासंघ

 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या