शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

आज विराजणार गणराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:47 IST

मुंबई, पुणे शहरानंतर अंबानगरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकर महिनाभरापूर्वीच गणेश उत्सवाच्या तयारीला लागले होते. गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. आता गणेश स्थापनेची प्रतीक्षा संपली आहे.

ठळक मुद्देउत्साह शिगेला : कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांचा उत्साह सोमवारपासून १० दिवस शिगेला पोहोचणार आहे. गणेश आगमनाची आतुरता आता संपली आहे. धुमधडाक्यात, गुलाल उधळत व जल्लोषात गणरायाचे स्वागतासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. गणेश उत्सवाला गालबोट लागू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.मुंबई, पुणे शहरानंतर अंबानगरीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकर महिनाभरापूर्वीच गणेश उत्सवाच्या तयारीला लागले होते. गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. आता गणेश स्थापनेची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारपासून अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची रंगत दिसणार आहे. सार्वजनिक मंडळांच्यावतीने नेत्रदीपक व डोळे दीपविणारे देखावे, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही रेलचेल अशा भक्तीमय वातावरणामुळे भक्तांची दहा दिवस गणेश आराधना चालणार आहे. बच्चे कंपनीपासून आबालवृद्धापर्यंत सर्व जण लाडक्या गणरायांचे आगमनात मग्न राहणार आहे.शहरात ४९२ गणेशमूर्तींची स्थापनाशहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यंदा ४९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. तसेच ४० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविल्या जाणार आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील ६४, कोतवाली २९, खोलापुरी गेट ३६, भातकुली २०, गाडगेनगर १०४, नागपुरी गेट १४, वलगाव ४५, फ्रेजरपुरा ६८, बडनेरा ६४ आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019