शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका ५९२.३१ कोटींच्या अर्थसंकल्पावर आज शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सोमवार ३० मार्च रोजी स्थायी समिती सभापती विलास इंगोले हे सादर करणार आहेत.

अमरावती : महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सोमवार ३० मार्च रोजी स्थायी समिती सभापती विलास इंगोले हे सादर करणार आहेत. अर्थसंकल्पावर यापूर्वीच स्थायी समिती सदस्यांनी सांगोपांग चर्चा करून प्रशासनाने सादर केलेल्या आकडेवारीवर साडेआठ कोटी रूपयानी वाढ केली आहे. सर्वसाधारण सभेत सदस्य किती कोटी रूपयांनी अर्थसंकल्पात वाढ करतात, हे सोमवारी स्पष्ट होईल.महापालिकेत तुटीचे अंदाजपत्रक तयार करण्याची तरतूद नसल्याने उत्पन्न व खर्च असा समतोल राखूनच लेखा विभागाने अंदाजपत्रक तयार केला आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या शहर सौंदर्यीकरण, विकास, प्रशासकीय गतिमानता व उत्पन्न वाढीसाठी अंदाजपत्रकामधील निवेदनामध्ये नमूद केलेल्या उपाययोजना प्रत्यक्ष उतरविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सात मराठी शाळांमध्ये तर पाच उर्दू शाळांमध्ये ई-लर्निंगची संकल्पना प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेमी इंग्रजी माध्यमाची सोय कॉन्व्हेंटच्या धर्तीवर महापालिका शाळेत अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका व ग्रंथालय या प्रकल्पास संगणक इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षकांना कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुधारित राष्ट्रीय शहर व कार्यक्रमांतर्गत भाजीबाजार येथील दवाखान्यात नवीन एक्सरे मशीन, बडनेरा येथील मोदी दवाखान्यात आॅपरेशन थिएटरचे नुतनीकरण, एनयुएचएम अंतर्गत मोदी हॉस्पिटलचे नुतनीकरण, नवसारी येथे व्यापारी संकुल व स्टेडीयम तर वलगाव मार्गावर अग्नीशमन केंद्र व ट्रक टर्मिनल तयार करण्याचा उपक्रम प्रस्तावित आहे. प्रभागनिहाय नागरी सुविधा केंद्र, आॅनलाईन सुविधा अंतर्गत किआॅक्स पथदर्शी प्रकल्पाचा प्रभागस्तरावर विस्ताराचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत परिवहन सेवेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने दोन तलाव, मोठ्या नाल्यांचा एकात्मिक विकास करण्याचा विस्तृत प्रकल्प केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला आहे. पंधरा उपाययोजनांपैकी दहा उपाययोजनांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पाच मिनिटात जन्म-मृत्यू दाखला देण्याची सोय प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)