शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:14 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर (नाफेड) अनियमितता असल्याची तक्रार करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडची तक्रार : सचिव, संचालकावर कारवाईची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर (नाफेड) अनियमितता असल्याची तक्रार करण्यात आली. यानुसार गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून तूर खरेदी केंद्रावर मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून बाजार समिती संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.नाफेड केंद्रावर गैरव्यवहार होत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने केली होती. या तक्रारीवरून शासकीय तूर खरेदी केंद्रावर सहायक निबंधक, सहकारी संस्था अंजनगाव सुर्जी यांनी चार तालुक्यांच्या सहा. निबंधकांची चौकशी समिती गठित करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकारने शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. यामध्ये अंजनगाव सुर्जी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करण्यात आली. मात्र, यात गैरव्यवहार होत असल्याची ओरड होत होती. परंतु बाजार समितीच्या कोणत्याच संचालकाने या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. बाजार समितीवर धडक मोर्चा नेऊन आंदोलन केले. याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी आर. आर. यादव (सहा. निबंधक, मोर्शी), एस. ए. गुडधे (सहा. निबंधक, अंजनगाव), बी. एस. पारोसे (चांदूररेल्वे), एन. व्ही. केसकर (अचलपूर) अशा चार अधिकाऱ्यांची बाजार समिती अंजनगाव येथे शासकीय तूर खरेदी केंद्राची तपासणी व कार्यालयीन लेखाजोखाची तपासणी समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक यांचेकडे सादर केला असून या अहवालामध्ये एकूण सोळा मुद्दा गंभीर त्रुट्या आढळून आल्या आहेत. याच अनुषंगाने चौकशीअंती कारवाई होण्याची शक्यता आहे.टोकन वाटप तसेच आवक-जावक रजिस्टर व्यवस्थित लेखाजोखा ठेवणे ही सर्व जबाबदारी बाजार समिती सचिवाची असल्यामुळे आम्ही बाजार समितीच्या संचालकांना सचिव महोदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.- एस. ए. गुडधे,सहा. निबंधक, अंजनगाव सुर्जी