शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर-दुचाकीमध्ये अपघात; एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: July 5, 2014 00:31 IST

टिप्पर- दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात टीप्पर पलटला. दुचाकीस्वार टीप्परखाली दबल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला.

अमरावती : टिप्पर- दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात टीप्पर पलटला. दुचाकीस्वार टीप्परखाली दबल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत मार्डी मार्गावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. प्रमोद रमेश कडू (२५) असे मृताचे नाव आहे. अपघातात प्रमोदचा साथीदार निलेश बाबाराव राऊत (३०) हा गंभीर जखमी झाला. आर्वी यथील सर्कसपूरचे रहिवासी प्रमोद कडू व निलेश राऊत हे दोघे शुक्रवारी त्यांच्या एमएच २२/जे ८९६९ क्रमांकाच्या दुचाकीने अमरावती येथून आर्वीकडे जात होते.टिप्पर क्रमांक सीजी १२/०७२६ क्रमांकाचा चालक मुरूम घेवून आर्वी येथून भरधाव वेगात अमरावतीकडे येत होता. दरम्यान टीप्पर चालकाचे मार्डी मार्गावर नियंत्रण सुटल्याने त्याने विरूध्द दिशेने येणाऱ्या प्रमोदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की , यामध्ये टिप्पर पलटला. त्याखाली प्रमोद कडू दबल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. हा अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळल्याने अमरावती-मार्डी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती फे्रजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करून तेथील वाहतूक सुरळीत केली.