शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा फळांचा राजा आंबा रुसला

By admin | Updated: April 21, 2016 00:07 IST

वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

आवक घटली : वादळी पावसाचा फटका, भावही प्रचंड वधारलेअमरावती : वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात आंब्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक आवक असणारा आंबा यंदा रुसला असा भास अमरावतीकरांना होत आहे. उन्हाळा आला की, सर्वप्रथम आंबा फळाची आठवण येते, चवदार व रसाळ आंबा बाजारात पाहून नागरिकांना मोह आवरत नाही. मात्र, यंदा बाजारातून आंबा गायब झाल्यासारखेच चित्र आहे. दरवर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची प्रतिष्ठाने थाटली जातात. तसेच चौकाचौकात व गल्याबोळ्यामध्येही आंब्यांच्या हातगाड्या फिरताना दिसतात. मात्र, यंदा ती परीस्थिती दिसून येत नाही. यंदा बाजारात आंबा विक्रीचे प्रतिष्ठाने व हातगाड्या कमी झाल्या आहे. दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक असते. मात्र, यंदा अवकाळी पावसासह गारपीटीच्या तडाख्याने आंबा उत्पादकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ ३० टक्केच आंबा बाजारात आला आहे. एप्रिल २०१५ मध्ये बाजार समितीकडे दररोज ३०० ते ५०० क्विटंल आंब्याची आवक होती. मात्र, यंदाच्या एप्रिलमध्ये ती आवक कमी होऊन २०० ते ३०० क्विंटलवर आली आहे. सद्यस्थितीत कर्नाटक राज्यातून आंबा येत असून अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील आंब्याची आवक सुरु झाली नाही. त्यातच विदर्भातील आंबाही अद्यापर्यंत बाजारात आला नसून केवळ कैऱ्याच बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षांत २ ते ३ हजार रुपये भावात मिळणार आंबा यंदा ३ ते ६ हजारापर्यंत गेला आहे. त्यामुळे यंदा आंब्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.