ट्रकचालकाला अटक : अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघात चांदूूरबाजार : स्थानिक यंगस्टार चौक ते जयस्तंभ चौकातील अनियंत्रित वाहतुकीने गुरूवारी एका महिलेचा बळी घेतला. दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान संत्र्याचे लाकूड घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले. या अपघातात ट्रकच्या मागच्या चाकात येऊन महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लझीनाबानो म. इफ्तेखार (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. संत्र्याचे लाकूड घेऊन ट्रक क्र. एम.एच.०४-एच.२६०७ हा यंगस्टार चौकातून जयस्तंभ मार्गे अमरावतीकडे जात होता. त्याचवेळी दुचाकी क्र. एम.एच.२७-बी.सी.४४९० ने इफ्तेखार व त्यांची पत्नी लझीनाबानो या पथ्रोट येथे विवाह सोहळा आटोपून शहरातील इस्लामपुरा परिसरातील घराकडे परतत असताना या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ट्रकचा धक्का लागल्याने लझीनाबानो या खाली पडल्या व ट्रकच्या मागच्या चाकात आल्या. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन ठाण्यात नेला. ट्रकचालक शेख फिरोज शे. हसन (४५, रा. गुलिस्तानगर, अमरावती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.यंगस्टार चौकातील अनियंत्रित वाहतूक पुन्हा ऐरणीवरयेथील यंगस्टार ते जयस्तंभ चौक मार्ग हा अपघातप्रवण बनला आहे. अनियंत्रित वाहतुकीकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढले आहेत. या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे वाहतूक नियंत्रकाची नियुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भरचौकात ट्रकने महिलेला चिरडले
By admin | Updated: June 5, 2015 00:38 IST