शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघाने केली म्हशीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:15 IST

दोन दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तळ ठोकून असलेल्या नरभक्षक वाघाने रविवारी रात्री ९:३० दरम्यान पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशीचे पिलू (वगार) ठार केले. धामणगाव, तिवसा तालुक्यात ५ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर त्या वाघाने मोर्शी परिसरात प्रवेश केला. त्यामुळे नारिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्याच्या मागावर वनविभाग पाळत ठेवून आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत कायम : तीन दिवस पाळत ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : दोन दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तळ ठोकून असलेल्या नरभक्षक वाघाने रविवारी रात्री ९:३० दरम्यान पिंपळखुटा मोठा येथील सतीश देशमुख यांच्या म्हशीचे पिलू (वगार) ठार केले. धामणगाव, तिवसा तालुक्यात ५ दिवस धुमाकूळ घातल्यानंतर त्या वाघाने मोर्शी परिसरात प्रवेश केला. त्यामुळे नारिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्याच्या मागावर वनविभाग पाळत ठेवून आहे.मोशी तालुक्यातील तळणी गावालगतच्या स्मशानभूमीजवळ प्रशांत सातंगे (रा. पिंपळखुटा मोठा) यांना रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास वाघ दिसला होता. सोमवारी मोर्शी शहरालगत असलेल्या येरला मार्गे तालुक्यातील चिंचोली गवळी येथे सकाळी ९:३० वाजता तो काही नागरिकांना दिसल्याची माहिती मिळाली. चिंचोली गवळी येथील अनिल एकोतखाणे यांच्या मालकीच्या म्हशीला जखमी केल्याचे त्यांनी यांनी वनविभागाला सोमवारी दुपारी कळविले.नरभक्षक वाघ हा येथून धारूड मार्गे नळा- मानी परिक्षेत्रातील सातपुडा पर्वतातील जंगलाकडे भरकण्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मागील आठ दिवसांपासून या वाघाने चांगलेच जेरीस आणल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये त्याची भीती कायम आहे. पुन्हा मानवसंहार होऊ नये, यासाठी वनविभागाची चमू त्या वाघाच्या मागावर आहेत. सलग तीन दिवस त्याच्या हालचालीवर सूक्ष्म लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. धामणगाव, तिवसा व मोर्शी अशा तीन तालुक्यात भ्रमंती करणाऱ्या या नरभक्षक वाघाची इत्थंभूत माहिती वन्यजीव विभागाला पाठविण्यात आली आहे.