शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या शासकीय व्हीव्हीआयपी विश्रामगृहात आले वाघोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:35 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले.

ठळक मुद्देचौकीदाराने घेतले स्वत:ला डांबून वन्यप्राण्यांची गावाकडे धूम

नरेंद्र जावरेअमरावती : डोळ्यापुढे अचानक वाघ दिसताच बापरे! म्हणत अंगावर शहारे येतात. मात्र विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले. चौकीदाराला वाघ दिसताच त्याने घाबरून स्वत:ला एका खोलीत डांबून घेतले. दहा मिनिटांनंतर वाघोबा गेले आणि त्याचा जीव भांड्यात पडला.चिखलदरा येथे विविध शासकीय विभागाचे विश्रामगृह आहेत. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह व्हीव्हीआयपी असून येथे राज्यपाल, मुख्यमंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींना आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो. शनिवारी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे विश्रामगृह परिसरात रोजंदारी चौकीदार किशोर सावलकर कामात मग्न असताना त्याच्यापुढील आवार भिंतीवरून वाघोबाने उडी मारली. कशाचा तरी आवाज आल्याने त्याने त्या दिशेने पाहताना दुरूनच पट्टेदार वाघ दृष्टीस पडले. घाबरून त्याने तेथून खोलीकडे पळ काढला. याची माहिती त्याने तत्काळ खानसामा मोबीन आणि शेख मोहसीन यांना दिली. त्यापूर्वीच वाघोबाने तेथून धूम ठोकली.अस्वलानंतर बिबट, वाघोबाचे दर्शनचिखलदरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलातील हिंस्त्र प्राणी गावाकडे कूच करीत आहेत. शनिवारी पहाटे चिखलदऱ्याच्या आठवडी बाजारात कामाच्या शोधात आलेल्या आदिवासी इसमावर अस्वलाने हल्ला केला. रात्री ११ वाजता व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृहात वाघोबाने उडी घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.न्यायाधिशांसाठी होते आरक्षण, वाघोबाला मुकलेरविवारी अचलपूर न्यायालयात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे जवळपास ११ न्यायाधीश येणार असल्यामुळे शनिवारी रात्री याच विश्रामगृहाच्या खोल्यांचे आरक्षण काही न्यायाधिशांसाठी करण्यात आले होते. मात्र कुणीच न आल्याने संपूर्ण परिसर रिकामा होता. जंगल सफारीदरम्यान चिखलदरा पर्यटन स्थळावर वाघ दिसावा, यासाठी पर्यटन मोठ्या प्रमाणात मुक्कामी असतात.विश्रामगृह परिसरात आवश्यक सुविधा आहेतच. आणखीन सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत वाढविणे किंवा आवश्यकतेनुसार इतर काही करता येईल.- चंद्रकांत मेहत्रे,कार्यकारी अभियंता,सा. बां. विभाग अचलपूरविश्रामगृह परिसरालगत सर्व जंगल परिसर आहे. वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे अस्वल वाघ हे आंबा, उंबर ओळखण्याच्या दृष्टीने येतात. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.- डी .के. मुनेश्वर,वनपरिक्षेत्राधिकारी, चिखलदरा

टॅग्स :Tigerवाघ