शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील हल्लेखोर वाघाला केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:05 IST

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला सारणी परिसरात फिरताना पाहून ट्रँक्युलाईज करून सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पकडण्यात आले.

ठळक मुद्देकान्हा नॅशनल पार्कमध्ये होणार रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरेअमरावती:  जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा चंद्रपूरचा नरभक्षी वाघ मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील सारणी क्षेत्रात ट्रँक्युलाईझ करून सोमवारी दुपारी ४.३० वाजता पकडण्यात आले. मागील दहा दिवसांपासून वाघाची परिसरात पुन्हा आपली दहशत पसरली होती. दोन दिवसांपासून मेगा आॅपरेशन सुरू होते. चार हत्ती तीन जेसीबी व दीडशे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या चमूने त्याला पकडले.मध्यप्रदेशच्या सारणी परिसरातील कॉल हेडलीन प्लांटजवळ हा वाघ नागरिकांना दिसला. तेथील एबी टाईप कॉलनीत त्याने आपली दहशत पसरली होती. तीन दिवसापासून शांतीनगर परिसरात त्याने ठाण मांडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीखाली आले होते. सदर वाघ नरभक्षी असल्याने तो येथेसुद्धा धुमाकूळ घालून माणसावर हल्ला करू शकतो. त्यापूर्वीच त्याच्या हालचालीवर दहा दिवसांपासून एसटीआर आणि वनविभागाच्या चमूने लक्ष ठेवले होते. दोन दिवसांपासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता वाघावर बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलाईझ करण्यात आले.  कान्हा नॅशनल पार्कमध्ये सोडणार नरभक्षीला नरभक्षी वाघाला कान्हा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती बैतुल उत्तर झोनचे उपवनसंरक्षक अशोक कुमार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :Tigerवाघ