लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मोथाखेडा गावात आदिवासी शेतकºयावर वाघाने हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर धूळघाट रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली. शामलाल सावलकर (४८), असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.मोथाखेडा गावातील शेतकरी शामलाल सावलकर हे रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान गावाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या शेतात गहू व हरभरा पिकाची रखवाली करण्याकरिता गेले होते. त्यांचे शेत वनखंड क्रमांक ११४९ लगत आहे. ते शेतात असताना तेथे जंगलातून अचानक वाघ आला. त्या वाघाने शामलालवर हल्ला चढविला. आरडाओरड केल्यानंतर तीन ते चार शेतकरी तेथे धावून आले. त्यांनी काठ्यांनी वाघाला पळवून लावले. शामलाल यांच्या हाताला व छातीला वाघाने पंजे मारल्याने ते गंभीर जखमी झाले. मदतीला धावलेल्या शेतकऱ्यांनी जखमी शामलाल यांना धूळघाट रेल्वे येथे आणले. दरम्यान काही नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.हल्ला झाल्याची माहिती मिळताच शामलालची रुग्णालयात भेट घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगेच घटनास्थळावर धाव घेतली. तेथे पगमार्ग आढळून आले. त्याची तपासणी केली. वाघ असण्याची शक्यता आहे. सध्यास्थितित त्या परिसरात शोध घेण्यात येत आहे.- योगेश तापस,वनपरिक्षेत्र अधिकारी, धूळघाट रेल्वे
मोथाखेड्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST
मोथाखेडा गावातील शेतकरी शामलाल सावलकर हे रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान गावाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या शेतात गहू व हरभरा पिकाची रखवाली करण्याकरिता गेले होते. त्यांचे शेत वनखंड क्रमांक ११४९ लगत आहे. ते शेतात असताना तेथे जंगलातून अचानक वाघ आला. त्या वाघाने शामलालवर हल्ला चढविला. आरडाओरड केल्यानंतर तीन ते चार शेतकरी तेथे धावून आले.
मोथाखेड्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला
ठळक मुद्देइ-वाघिणीनंतर पुन्हा दहशत, पगमार्क आढळले