शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भजनांच्या माध्यमातून चरित्र व चारित्र्य निर्माण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:01 IST

भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देबबनराव सराडकर : गुरुकुंजातील पुण्यतिथी महोत्सवात भजन संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भजन संमेलनाचे उद्घाटन सराडकर यांनी बुधवारी केले. अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख स्नेहाशिष दास, शरद प्रतिष्ठानचे संयोजक नंदकुमार बंड, माजी उपायुक्त महादेव राघोर्ते, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, रमेश डेहणकर, नारायण गोमासे, श्रीकांत तोटे, नानासाहेब निवल, दत्ताजी राऊत, बाबूभाई टोले, नीलेश गळे, रघुनाथ कर्डीकर यांची उपस्थिती होती.मुख्य कार्यक्रमापूर्वी अजय चव्हाण, श्रीजय चव्हाण, चेतन अंबोरे यांच्या चमूने खंजिरी भजनांचे सादरीकरण केले. भजन संमेलनाचे प्रास्ताविक मानवसेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले. संचालन माधुरी भोयर व राहुल काळे यांनी केले.आज आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धामहोत्सवात गुरुवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होईल. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर विलास साबळे चिंतन व्यक्त करतील. नीळकंठ हळदे ग्रामगीता प्रवचन करतील. डॉ. मुस्ताक शेख हृदयरोग प्रतिबंधावर माहिती देतील. सायंकाळी साहित्यिक सुभाष सावरकर सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत करतील. यानंतर वरवट खंडेराव येथील श्रीगुरुदेव मित्र भजन मंडळाची भजने व अमरावतीच्या मुक्ता नाल्हे यांचे अभंग गायन होईल. रात्री ९.१५ ते १०.३० दरम्यान नीलेश गावंडे कीर्तन सादर करतील.