शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेत रोहयोच्या मुद्यावर गदारोळ

By admin | Updated: May 30, 2014 23:21 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या नांदगाव तालुक्यातील रस्त्याची कामे मजुरांमार्फत न करता जेसीबीने केल्या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ माजला.

सर्वसाधारण सभा : विविध विषयांवरही चर्चाअमरावती : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या नांदगाव तालुक्यातील रस्त्याची कामे मजुरांमार्फत न करता जेसीबीने केल्या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ माजला.जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांना अनुसरून डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत मंजूर केलेल्या नांदगाव तालुक्यातील अडगाव ते पारडी,एरंडगाव ते मालखेड व अन्य काही रस्त्याची कामे मजुरामार्फत न करता जेसीबीने केल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, असा मुद्दा सभागृहात जिल्हा  परीषद सदस्य रवींद्र मुंदे, अभिजीत ढेपे, निशिकांत जाधव, आदी सदस्यांनी रेटून धरली. या विषयावर बराच वेळ वादळी चर्चा रंगली. अखेर नांदगावच्या गटविकास अधिकार्‍यांनी त्यांची बाजू मांडली. मात्र, यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे याविषयावर अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सीईओंना दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले. त्यामुळे हा मुद्दा येथे निवळला. यासोबतच नांदगाव तालुक्यात ६९ गावामध्ये मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरी लाभार्थ्याना कामे सुरू केल्यानंतरही निधीचा हप्ता देण्यात आला नाही. या विषयावरही जिल्हा परिषदेच्या आमसभेत चर्चा करण्यात आली.